कोरोना लसीवरून आता केजरीवालही कडाडले, लस खुल्या बाजारात मिळण्याची केली मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनावरील लशींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र व केंद्र सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु असताना दुसऱ्या बाजूला या लसीवरून आम आदमी पक्षाचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही टीकास्त्र सोडले आहे Now Kejriwal is also statement for corona vaccine

मलेरिया, पोलिओ वा कोणतीही लस केमिस्टकडे मिळते. त्याप्रमाणे कोरोनाची लस केमिस्टला का पुरविली जात नाही? केंद्र सरकारने सर्वांसाठी ही लस खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली पाहिजे. अशी मागणी दिल्लीतील आम आदमी पक्षाने केली आहे.



तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहले असून, लस केवळ दवाखान्यात देण्याची अट शिथिल करावी. त्यानंतर आम्ही घरोघर जाऊन लसीकरण करू, असे त्यात म्हटले आहे.

कोरोना ही लस देखील इतर लसांप्रमाणे सामान्य ठिकाणी सर्वत्र उपलब्ध असावी आणि लोकांना ही लस घ्यावी याचा त्यांचा हक्क आहे. परंतु लस कोणाला हवी आहे आणि कोणाला याची गरज नाही हे कोण ठरवेल? सरकारी बाबू आणि केंद्र सरकारमधील नेते? केंद्र सरकारच्या आत बसून कोण कोणाची गरज आहे आणि कोण नाही हे ठरवू शकत नाही.

Now Kejriwal is also statement for corona vaccine

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात