रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर्मनी आणि पोलंडनंतर भारत हा हरित ऊर्जेचा वापर सुरू करणारा जगातील तिसरा देश असेल. Now Indian Railways will run on hydrogen fuel, making India the third country to do so
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे ही हायड्रोजन इंधन (ग्रीन इंधन) वर चालवण्याची तयारी करत आहे.नवीन रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा हा ऐतिहासिक उपक्रम शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर्मनी आणि पोलंडनंतर भारत हा हरित ऊर्जेचा वापर सुरू करणारा जगातील तिसरा देश असेल.
अधिकाऱ्याने सांगितले की, दोन लोकल गाड्यांमध्ये (डीईएमयू) हायड्रोजन इंधन सेल बसवण्यात येतील. नंतर नॅरो गेज इंजिनला हायड्रोजन इंधन सेल सिस्टीममध्ये रूपांतरित केले जातील.
भारतीय रेल्वेने राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी मिशन अंतर्गत हरियाणातील सोनीपत-जींदच्या 89 किमी विभागात चालणाऱ्या डेमू ट्रेनमध्ये हायड्रोजन इंधन सेल आधारित तंत्रज्ञान बसवण्यासाठी कंत्राट केल आहे. 21 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान कंत्राट दाखल करता येतील. निविदापूर्व बैठक 17 ऑगस्ट रोजी होणार आहे.
अधिकारी म्हणाले की, हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या डेमू ट्रेनमुळे दरवर्षी सुमारे 2.3 कोटी रुपयांची बचत होईल. आणि 11.12 किलोटन नायट्रोजन डायऑक्साइड आणि 0.72 किलोटन कार्बन कणांचे उत्सर्जन कमी होईल. या प्रणालीमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून पाण्याचे विघटन करून हायड्रोजन प्राप्त होते. हे आजपर्यंतचे सर्वात हिरवे इंधन मॉडेल मानले जाते. या प्रयोगाच्या यशानंतर, सर्व डिझेल इंजिन हायड्रोजन फ्यूएल सेलमध्ये रूपांतरित होतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App