एम्समध्ये सेवा सुरू, जाणून घ्या हायटेक ॲम्ब्युलन्समध्ये काय सुविधा असतील?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ऋषिकेशमध्ये आजपासून 108 रुग्णवाहिकेप्रमाणे हेली रुग्णवाहिका सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सेवेचा शुभारंभ करणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी या ऐतिहासिक सेवेचे व्हर्चुअली उद्घाटन करणार आहेत. आज हेली रुग्णवाहिका सुरू करणारी ऋषिकेश एम्स ही देशातील पहिली संस्था बनेल.
ऋषिकेश एम्सचे कार्यकारी संचालक प्रा. मीनू सिंह यांनी सांगितले की, शुभरंभासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक खासदार आणि आमदार एम्समध्ये उपस्थित राहणार आहेत. संजीवनी योजनेंतर्गत हेली सेवा राबवलीत येणार आहे. सेवा पूर्णपणे मोफत असेल. त्याचे फायदे राज्यभर मिळणार आहेत. हेली रुग्णवाहिकेच्या चाचण्या अनेक टप्प्यांत घेण्यात आल्या, ज्या पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत.
Karnataka government ‘कर्नाटक सरकार लँड जिहाद करतंय’, भाजपचा आरोप
कार्यकारी संचालक प्रा.सिंह म्हणाले की, सेवेचा गैरवापर रोखण्यासाठी गरजूंना ओळखण्यासाठी विशेष रचना तयार करण्यात आली आहे. कोणत्याही अपघातग्रस्ताला तत्काळ उपचाराची गरज भासल्यास डॉक्टरांच्या सूचनेनुसार स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हेली रुग्णवाहिकेचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले. ज्या रुग्णाची प्रकृती सर्वाधिक गंभीर असेल त्यांनाच प्राधान्य दिले जाईल. संपूर्ण उत्तराखंडमध्ये या सेवेचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे हेली रुग्णवाहिकेचा लाभ उत्तराखंडच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील काही भागात दिला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App