विशेष प्रतिनिधी
बंगळूर – कोरोना व इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या जिल्हा व तालुका रुग्णालयांतील आयसीयू व इतर वॉर्डात आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. अशा सर्व वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने दिला आहे. Now CCTV deployed in hospitals also
जिल्हा व तालुका रुग्णालयात कोरोना व इतर रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारासंदर्भात अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णालयात ऑक्सिजन, औषधे व इतर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील चामराजनगर, गुलबर्गा, हुबळीसह विविध जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
ऑक्सिजनच्या कमतरतेऐवजी रुग्णांचा इतर काही कारणामुळे मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी व सरकारने केला आहे. परंतु विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. त्यामुळे रुग्णांवर करण्यात येणारे उपचार, त्यांना देण्यात येणारी औषधे व इतर सुविधांवर लक्ष देण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App