विशेष प्रतिनिधी
कोलकत्ता : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत अशी टीका वारंवार होते. पण केवळ उध्दव ठाकरेच नव्हे तर आणखी एक मंत्रीही गेल्या सतरा महिन्यांपासून मंत्रालयात गेलेच नाहीत. ते घरूनच काम करत आहेत. पश्चिम बंगालमधील हे मंत्री असून विशेष म्हणजे त्यांच्याकडे अर्थमंत्रीपदाची धुरा आहे.Not only Uddhav Thackeray but also this minister have not been in the ministry for the last seventeen months, they are working from home
पश्चिम बंगालमध्ये मे महिन्यात दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉँग्रेसचे सरकार सत्तेवरआले आहे. तेव्हापासून अमित मित्रा हे मंत्री मंत्रालयात गेलेले नाहीत. मित्रा हे यापूर्वीच्या सरकारमध्येही अर्थमंत्रीच होते. तेव्हाही पंधरा महिने ते मंत्रालयात गेले नव्हते. याचे कारण म्हणजे ते व्याधीग्रस्त (कोमॉरबिड) आहेत. त्यामुळे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून त्यांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. विधानसभेच्या अधिवेशनालाही ते आले नव्हते. त्याचबरोबर अर्थसंकल्पही त्यांनी सादर केलेला नाही.
अमित मित्रा हे ७४ वर्षांचे आहेत. ममता बॅनर्जी सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री मानले जातात. कोरोनामुळे त्यांनी यावेळी निवडणूकही लढविली नव्हती. निवडून आलेले आमदार नसतानाही त्यांना अर्थमंत्री करण्यात आले आहे.
अमित मित्रा यांनी घरून काम करताना यंत्रणा तयार केली आहे. त्यांनी ई-गव्हर्नंसवर जास्तीत जास्त भर दिला आहे. मित्रा यांना फुफुस्सांचा विकार आहे. त्याचबरोबर क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (सीओपीडी)देखील आहे.
मंत्रालयात जात नसले तरी मित्रा हे व्हर्च्युअल बैठकांमध्ये सहभागी होता. डिजिटल सही करून डिजिटल नोटिंग करतात. त्याचबरोबर त्यांनी आपल्या विभागात ई- फाईलची यंत्रणा सुरू केली आहे. निविदा प्रक्रियाही त्यांनी ई-निविदाच्या रुपात सुरू केली आहे. त्यामुळे घरी बसूनच त्यांना सगळे काम करणे शक्य होते.
https://youtu.be/ZmVYzK2BN9Y
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App