वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे जयपूर येथील हवामहालची प्रतिकृती साकारली आहे. ती काढून टाकण्याचे आदेश उत्तर दिल्ली महापालिकेने दिल्यामुळे कलाकारांच्या मेहनतीबरोबरच त्यासाठी खर्च झालेले 20 लाख रुपये पाण्यात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.राजस्थानातील जयपूर येथे ऐतिहासिक हवामहल आहे. तो लाखो पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.North Delhi Municipal Corporation order’s to remove the replica Of Jaipur Hawa Mahal
यापार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला ते फत्तेपुर मशिद या सुमारे 1.3 किलोमीटर मार्गावर रस्त्याकडेला चांदणी चौकात हा हवामहल राजस्थानातील व्यापारी आणि वास्तुविशारद अनिकेत केयाल यांनी साकारला आहे. विशेष म्हणजे या हवामहलचा रस्त्यावर कोणताही अडथळा नाही.
पण, त्याचा भाग रस्त्यावर 6 इंच अधिक आल्याचे कारण सांगून तो हटविण्याचा आदेश महापालिकेने दिला आहे. विशेष म्हणजे हा हवामहल पादचारी मार्गाच्या कडेला आहे. या भागात कर फ्री झोन लागू आहे. परिसराच्या सौन्दर्यात अधिक भर पडावी, यासाठी हा हवामहल फायबर आणि प्लास्टर ऑफ पॅरिसने साकारला आहे.
तसेच तो जयपूर येथील बांधकामाप्रमाणे दिसावा, यासाठी लाल रंगाचे दगड बसविले आहेत. 2019 मध्ये त्याची दुरुस्ती करण्याची परवानगी अनिकेत केयाल यांनी मागितली होती. ती देण्यात आली. परंतु सध्या केलेले बांधकाम नवे आहे. त्यामुळे ते हटवावे, तसेच ते 6 इंच बाहेर आल्याने आदेशात पालिकेने नमूद केले आहे.
पालिकेच्या मर्जीनुसार हवामहल हटवू : केयाल
अनिकेत केयाल यांच्या मते हवामहलच्या अंतर्गत भागात काहीच बदल केलेला नाही. परंतु बाह्य भागात काळानुसार केवळ दुरुस्ती केली आहे. परिसर सुंदर दिसावा, यासाठी माझा खटाटोप होता. लोकांनीही या हवामहलचे कौतुकच केले. पालिकेने तो हटवाचा असा आग्रह धरला तर मी तो काढून टाकण्यास तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App