वृत्तसंस्था
मुंबई : Noel Tata टाटा ट्रस्टने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून नोएल टाटा ( Noel Tata ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. रतन यांच्या निधनानंतर ते या पदासाठी एकमेव दावेदार होते. त्यांचे बंधू जिम्मी यांचेही नाव चर्चेत होते. पण ते यापूर्वीच रिटायर झालेत. त्यामुळे बोर्डाने नोएल यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले.Noel Tata
सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कुणाची निवड होणार? हा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. टाटा ट्रस्टने शुक्रवारी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते.
टाटा ट्रस्टने एका अधिकृत निवेदनात म्हटले की, ‘नोएल टाटा यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल.’
नोएल टाटा म्हणाले- माझ्या सहकारी विश्वस्तांनी मला दिलेल्या या जबाबदारीमुळे माझ्या मनात अत्यंत सन्मानित व विनम्रतेची भावना निर्माण झाली आहे. मी श्री रतन टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे. एका शतकाहून अधिक काळापूर्वी स्थापन झालेला टाटा ट्रस्ट सामाजिक कार्यांचे एक अद्वितीय माध्यम आहे. या प्रसंगी आम्ही आमची विकास व जनहिताची कामे पुढे नेण्यासाठी व राष्ट्र निर्माणातील आपली भूमिका बजावण्यासाठी पुन्हा एकदा स्वतःला समर्पित करत आहोत.
नोएल यांचीच निवड का… 5 कारणे
एक – टाटा समूहाशी निगडित असलेल्या पारशी समुदायाचे म्हणणे होते की, अध्यक्ष हा टाटा यांच्या नावाशी संबंधित कोणीतरी असावा. त्यामुळे नोएल यांची एकमताने निवड झाली.
दोन – नोएल 40 वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाशी संबंधित आहेत. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या ट्रस्टचे बहुसंख्य शेअर्स आहेत. टाटा समूहाशी प्रदिर्घ संबंध आणि या ट्रस्टमधील त्यांच्या भूमिकेमुळे नोएल अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.
तीन – नोएल हे 2014 पासून ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ट्रेंट ही ज्युडिओ आणि वेस्टसाइडची ओनर आहे. त्यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 6000% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
चार – बोर्डाने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतला. हा निर्णय रतन टाटा यांच्याच पुढे जात राहा या तत्वज्ञानावर घेण्यात आला. म्हणजे लीडरशिपमध्ये कोणताही अडथळा आला नाही पाहिजे.
पाच – नोएल यांना या जबाबदारीसाठी गत काही काळापासून तयार केले जात होते.
नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नीचे सुपुत्र
नोएल हे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे सुपुत्र आहेत. तर रतन टाटा व जिम्मी टाटा नवल व त्यांच्या पहिल्या पत्नी सूनी यांचे सुपुत्र आहेत.
नोएल यांचीच निवड का?
टाटा समूहाशी निगडित असलेल्या पारशी समुदायाचे म्हणणे होते की, अध्यक्ष हा टाटा यांच्या नावाशी संबंधित कोणीतरी असावा. त्यामुळे नोएल यांची एकमताने निवड झाली. नोएल 40 वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाशी संबंधित आहेत. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. टाटा सन्समध्ये या ट्रस्टचे बहुसंख्य शेअर्स आहेत. टाटा समूहाशी प्रदिर्घ संबंध आणि या ट्रस्टमधील त्यांच्या भूमिकेमुळे नोएल अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. नोएल हे 2014 पासून ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. ट्रेंट ही ज्युडिओ आणि वेस्टसाइडची ओनर आहे. त्यांच्या नेतृत्वात मागील 10 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 6000% पेक्षा अधिक वाढ झाली आहे.
बोर्डाने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्याच दिवशी झालेल्या बैठकीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा निर्णय घेतला. हा निर्णय रतन टाटा यांच्याच पुढे जात राहा या तत्वज्ञानावर घेण्यात आला. म्हणजे लीडरशिपमध्ये कोणताही अडथळा आला नाही पाहिजे. नोएल यांना या जबाबदारीसाठी गत काही काळापासून तयार केले जात होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App