विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जोपर्यंत चीनचे सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून हटवले जाणार नाही, तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना ठणकावून सांगितले.No talks until troops withdraw from border, Ajit Doval slams Chinese foreign ministers
चीनचे परराष्ट्र मंत्री सध्या भारताच्या दौºयावर आहे. त्यांच्यासोबत सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत भारताने सीमाभागातील उर्वरित भागात तातडीने आणि पूर्णपणे चिनी सैन्य मागे घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जेणेकरून द्विपक्षीय संबंध योग्य मार्गावर येऊ शकतील.
भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक, लष्करी पातळीवर सकारात्मक चर्चा सुरू ठेवण्यावर भर दिला आहे. अजित डोवाल यांनी वांग यी यांना समान आणि परस्पर सुरक्षिततेच्या भावनेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, एकाच दिशेने काम करा आणि तोडगा न निघालेल्या मुद्द्यांवर लवकरात लवकर निर्णया घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
चर्चा पुढे नेण्यासाठी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अजित डोवाल यांना चीन भेटीचे निमंत्रण दिले आहे. यावर डोवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीचे प्रश्न यशस्वीरित्या सोडवल्यानंतर चीनला भेट देऊ शकतो असे सांगितले. तसेच, सध्याची परिस्थिती कोणाच्याही हिताची नाही आणि शांतताच एकमेकांमध्ये विश्वास निर्माण करेल, असेही अजित डोवाल म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App