‘’तो काळ आता गेला जेव्हा भारताच्या जमीनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होतं.’’, असंही म्हणाले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी चीनवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, ‘’आता आमच्या सीमेकडे कोणीही डोळे वर करून पाहू शकत नाही. तो काळ आता गेला जेव्हा भारताच्या जमीनीवर कोणीही अतिक्रमण करू शकत होतं.’’ No one can take even an inch of Indias land Home Minister Amit Shahs warning to China
असे मानले जाते की चीनने नुकतीच अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या नकाशातील ११ ठिकाणांची नावे बदलली आहेत. यानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्र्यांचा अरुणाचल दौरा चीनसाठी मोठा संकेत मानला जात आहे. गृहमंत्र्यांचा दृष्टिकोनही या काळात अतिशय टोकदार असल्याचे दिसून येते.
याशिवाय शाह यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, १९६२ च्या युद्धासाठी आलेल्यांना येथील लोकांच्या देशभक्तीमुळे परत जावे लागले. भारताची सुईच्या टोकाइतकीही जमीन कोणीही घेऊ शकत नाही.
या दरम्यान अरुणाचलमध्ये भाजपाने केलेल्या कामांची मोजदाद करताना शाह म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी एक काळ असा होता की येथील गावे रिकामी होत होती, विकास नव्हता. मात्र केंद्रातील मोदी सरकारने या गावांची काळजी घेत या ठिकाणी विकास घडवून आणला आहे. ही भारतातील पहिली गावं आहे जिथे रोजगार देण्याचे कामही भाजप सरकारने केले आहे.
Speaking at the launch of ‘Vibrant Villages Programme’ from Kibithoo, the border village of Arunachal Pradesh and India’s easternmost place. #VibrantVillagesProgram https://t.co/MRbQxWzMkW — Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) April 10, 2023
Speaking at the launch of ‘Vibrant Villages Programme’ from Kibithoo, the border village of Arunachal Pradesh and India’s easternmost place. #VibrantVillagesProgram https://t.co/MRbQxWzMkW
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) April 10, 2023
शहा यांनी वातावरणाचे कौतुक केले –
अमित शाह यांनी या ठिकाणच्या भौतिक सौंदर्याची प्रशंसा केली आहे. अरुणाचलला पोहोचल्यावर भारतातील पहिल्या गावाचा धबधबा पाहून आनंदाने भरून आल्याचे त्यांनी सांगितले. भारतात सर्वात आधी सूर्य उगवणारे हे गाव आहे. शाह यांनी १९६२ च्या युद्धाची आठवण करून दिली आणि त्या वेळी लढलेल्या 6 अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.स्थानिक लोकांचे कौतुक करताना ते म्हणाले की, येथील लोकांमध्ये भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलांबद्दल आदराची भावना आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App