वृत्तसंस्था
नवी दिल्ली : एका राज्यातून दुसर्या राज्यात वाहनांची पुन्हा नोंदणीपासून मुक्त होण्याची नवी योजना सरकार आणत आहे. अशा वाहनांना विशेष मालिकेचे क्रमांक देणार आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यामुळे वाहन मालक त्रासापासून मुक्त होणार आहेत. No need to re-register vehicles when moving to another state
वाहनांचे पुन्हा नोंदणी करताना वेळ आणि पैसे खर्च होतो. त्यावर सरकारने अशा वाहनांना विशेष सीरिजचे नंबर द्यावेत, अशी अधिसूचना काढली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्णयामुळे खासगी वाहने एका राज्यातून दुसर्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी हा नवीन निर्णय घेतला आहे.
मसुद्याच्या अधिसूचनेनुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या अशा खासगी वाहनांना IN सीरिज नंबर देण्यात येतील. या अधिसूचनेवर मंत्रालयाने राज्य व केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त सामान्य नागरिकांकडून ३० दिवसांत सूचना मागविल्या आहेत.
सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं
सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं होईल. दुसरीकडे, ज्या लोकांचा ट्रान्सफर होण्यासारखा जॉब आहे त्यांना फायदा होईल. लोकांना दोन्ही राज्यांच्या आरटीओच्या भोवती फिरण्याची गरज भासणार नाही.मात्र , अशा वाहनांवर सरकार दोन वर्षांसाठी किंवा दोन वर्षांच्या मल्टीप्लिकेशननं मोटार वाहन कर आकारेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App