वृत्तसंस्था
पुणे : DRDO अर्थात भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था संस्थेमधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हनीट्रॅप मध्ये अडकून त्यांना अटक झाल्यानंतर संस्थेने आपले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भात कठोर पावले उचलली असून या सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत. No calls from unknown numbers, avoid social media; DRDO issues strong advisory to its personnel
माहिती नसलेल्या अननोन नंबर्स आणि परदेशातल्या नंबर्स वरून कॉल घेणे आणि करणे टाळा. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापरही टाळा अशा या कठोर सूचना आहेत.
डीआरडीओचे प्रमुख डॉ. समीर कामत यांनी प्रदीप कुरुलकर आणि ट्रॅप प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी या सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सायबर डिसिप्लिन अर्थात सोशल मीडिया वापरा संदर्भातली शिस्त या विषयावर तज्ञांची व्याख्याने देखील त्यांनी आयोजित केली आहेत.
डीआरडीओचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी महिलेच्या हानी ट्रॅपमध्ये अडकले. संस्थेतील संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी गोपनीय माहिती त्यांच्यामुळे लीक झाली. त्यामुळे त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे देखील झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर संस्थेचे प्रमुख डॉ. समीर व्ही. कामत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कठोर सूचना जारी केल्या आहेत, जेणेकरून भविष्यकाळात डीआरडीओ सारख्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गोपनीय संस्थेबाबत आणि उपक्रमाबाबत कोणतीही संवेदनशील, अतिसंवेदनशील माहिती लिक होता कामा नये, यासाठी या उपाययोजना केल्या आहेत. संस्थेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर लक्ष देखील ठेवण्यात येणार आहे. संस्थेतील त्याचबरोबर संरक्षण आणि तपास या यंत्रणा देखील अधिक कार्यक्षम करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App