नितीश – लालू सरकारने बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेत वाढवली यादव – मुस्लिम लोकसंख्या; अमित शाहांकडून पोलखोल!!

विशेष प्रतिनिधी

मुजफ्फरनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात सुरू केलेल्या सर्व समावेशक हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी काँग्रेस सह सर्व विरोधी पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे करून समाजाला जातीपातींमध्ये विस्कळीत करण्याचे धोरण आखले. त्याची पोलखोल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुजफ्फरनगर मधील जाहीर सभेत केली. काँग्रेसह सर्व विरोधी पक्ष जात निहाय जनगणना कशासाठी मागत आहेत त्यांना नेमका कोणता हेतू साध्य करायचा आहे हे अमित शाहांनी उघड करून सांगितले. Nitish – Lalu government increased the Yadav – Muslim population in the caste-wise census in Bihar

अमित शाह म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार, लालूप्रसाद यादव यांच्या सरकारने जातनिहाय जनगणना केली, पण त्यांनी जनगणनेचे आकडे जाहीर करताना बिहारमध्ये मुस्लिम आणि यादव या दोन समुदायांची संख्या वाढवून सांगितली. ईबीसी म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास अर्थात आर्थिक मागासांची आणि अति पिछडे यांची संख्या मुद्दामून घटवली. अति पिछडयांवर अन्याय केला. त्यांना संपूर्ण समाजाला जातीपातींमध्ये वाटून विस्कळीत करायचे आहे म्हणूनच त्यांनी अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करून जातनिहाय जनगणनेत मुस्लिम आणि यादव समुदायांची संख्या वाढवून दाखवली असा आरोपही अमित शाह यांनी केला.

“इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांचा डाव

अमित शाह यांनी ज्या पद्धतीने जातनिहाय जनगणनेची पोलखोल केली, ते लक्षात घेता “इंडिया” आघाडीतल्या घटक पक्षांचा नेमका डाव काय आहे??, हे उघड होते.

कोणत्याही राज्यात जातनिहाय जनगणना करताना तिथला मुख्य जात समूह अथवा क्रमांक दोनचा जात समूह आणि मुस्लिम समूह यांची जनसंख्या वाढवून दाखवायची. त्यामुळे आपोआपच इतर सर्व छोट्या-मोठ्या जात समूहांची जनसंख्या ही त्या प्रमाणात कमी दाखवत आपला राजकीय – सामाजिक हेतू साध्य करून घ्यायचा. हा डाव अमित शाहांनी उलगडून सांगितला.

बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राजकारण यादव जात समूहावर आधारित आहे. त्यामध्ये मुस्लिम समुदायाला जोडले की ती जनसंख्या लालूप्रसादांचे राजकारण तगण्यासाठी पुरेशी ठरते. त्यामुळेच जातनिहाय जनगणना करून बिहारमध्ये “वाय – एम” समीकरण अर्थात यादव – मुस्लिम समीकरण नितीश – लालू सरकारने दृढमूल केले आहे. त्याचीच पोलखोल आज अमित शाह यांनी केली.

Nitish – Lalu government increased the Yadav – Muslim population in the caste-wise census in Bihar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात