Nitish Kumar : नितीश कुमार यांच्या मुलाचे सक्रीय राजकारणात पदार्पण होणार

Nitish Kumar

बिहारमध्ये जेडीयू कार्यालयाबाहरे लागले सूचक बॅनर


विशेष प्रतिनिधी

पाटणा : Nitish Kumar नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार हे बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. निशांत कुमार नुकतेच दिल्लीहून परतल्यापासून बिहारमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या जनता दल-युनायटेड म्हणजेच नितीश कुमार यांचा पक्ष कार्यालयाच्या बाहेर लावण्यात आलेल्या निशांत कुमार यांच्या पोस्टरमुळे बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.Nitish Kumar

मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. त्यांच्या राजकीय वक्तृत्वाबद्दल ते चर्चेत असताना, तेजस्वी यादव सारख्या बिहारमधील मोठ्या नेत्यांनाही ते उत्तर देत आहेत. अलिकडेच निशांत यांनी दिल्ली दौरा केला होता, त्यामुळे त्याच्या राजकीय पदार्पणाची शक्यता निर्माण झाली होती. निशांत यांनी बिहार निवडणुकीवरही प्रतिक्रिया दिली होती आणि एनडीएला पुन्हा सत्तेत आणण्याबद्दल बोलले होते.

सध्या जेडीयू कार्यालयाबाहेर निशांत कुमार यांचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शनिवारी, पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेरील पोस्टर्सद्वारे निशांत कुमार यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले गेले आहे. एका पोस्टरवर लिहिले आहे की, ‘बिहार करे पुकार, आइए निशांत कुमार’ जेडीयूचे कार्यकर्ते सुनील सिंह यांनी लावलेल्या पोस्टरवर नितीश कुमार आणि निशांत कुमार दोघांचेही फोटो होते.

Nitish Kumars son to make debut in active politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात