वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपला सत्तेवरून हटवल्यानंतर नितीश कुमार यांनी मिशन 2024 ची तयारी सुरू केली आहे. याचसाठी सोमवारी ते तीन दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत पोहोचले. पहिल्याच दिवशी त्यांनी विरोधी पक्षातील 5 बड्या नेत्यांची भेट घेतली.Nitish Kumar’s Mission 2024 5 opposition leaders meet in Delhi, 13 to challenge BJP in 500 seats
यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी, सीपीआय(एम) सरचिटणीस सीताराम येचुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रीमो शरद पवार यांचा समावेश आहे.
याशिवाय ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव गट) आणि ओडिशाचे मुख्यमंत्री बिजू जनता दल यांच्या नेत्यांसोबत नितीश यांची बैठक प्रस्तावित आहे. राजकीय वर्तुळात नितीश यांच्या दिल्ली दौऱ्याकडे विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. बिहारमध्ये भाजपसोबतची युती तोडल्यापासून नितीश सातत्याने विरोधी नेत्यांच्या संपर्कात आहेत.
नितीश यांच्या प्रयत्नांना यश आले तर 2024 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येऊ शकतात. नितीश महाआघाडीसाठी प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2015 मध्येही त्यांनी प्रयत्न केले, पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
500 हून अधिक जागांवर थेट लढाईची तयारी
नितीश यांचा दिल्ली दौरा यशस्वी झाला आणि सर्व पक्ष एकवटले तर आगामी लोकसभा निवडणुकीत पाचशेहून अधिक जागांवर भाजपशी थेट लढत होईल. नितीश ज्या पक्षांशी संपर्क साधत आहेत ते सर्व पक्ष दक्षिण ते उत्तर भारतात प्रभावी आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App