बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निमित्ताने नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला संदेश तर दिला नाही ना अशीही चर्चा सुरू झाली आहे.Nitish Kumar’s message to BJP! Attended Iftar party at Tejaswi Yadav’s house
विशेष प्रतिनिधी
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निमित्ताने नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला संदेश तर दिला नाही ना अशीही चर्चा सुरू झाली आहे.विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत आरजेडीच्या विजयानंतर यादव यांनी शक्ती प्रदर्शन म्हणून ही पार्टी आयोजित केली होती.
तेजस्वी यादव यांच्या पाटण्यातील घरी इफ्तार पार्टीसाठी आलेल्यामध्ये भाजप नेते अवधेश नारायण सिंह आणि सय्यद शाहनवाज हुसेन, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, तेजस्वी यादव यांचे भाऊ तेज प्रताप यादव आणि मिसा भारती आणि त्यांची आई राबडी देवी यांचा समावेश आहे.
नितीश कुमार यांनी पाच वर्षानंतर तेजस्वी यादव यांच्या घरी इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यापूर्वी ते शेवटचे 2017 मध्ये आले होते. यावेळी जनता दलने (युनायटेड) बिहारची महाआघाडीला सोडूनआणि भाजपसोबत पुन्हा युती केली होती. नितीश कुमार आणि लालू यादव यांच्या कुटुंबातील संबंध तेव्हा अत्यंत वाईट झाले होते
या पार्टीत चिराग पासवान नितीशकुमारांच्या पाया पडले. त्यांचे वडील रामविलास पासवान यांचे ऑक्टोबर २०२० मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर दोघेही प्रथमच भेटले.इफ्तार पार्टीचा मूड आणखी एका कारणासाठी उत्साही होता. याचे कारण म्हणजेचारा घोटाळ्याच्या प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App