मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून राजभवनापर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी
बिहार : बिहारच्या राजकारणात अनेक दिवसांपासून सुरू असलेली रस्सीखेच अखेर संपुष्टात आली आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन करणार आहेत. नितीश कुमार यांनी राजभवन गाठून राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, आम्ही राज्यातील महाआघाडीशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. Nitish Kumar resigned
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आता ते पुन्हा एकदा भाजपच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन करणार आहेत. आज संध्याकाळीच ते नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.
नितीश कुमार यांचा एनडीएमध्ये प्रवेश निश्चित! 28 रोजी शपथविधी, सुशील मोदी होऊ शकतात उपमुख्यमंत्री
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत पक्षाचे प्रवक्ते श्याम सुंदर शरण म्हणाले की, आम्ही एनडीएचा भाग होणार हे स्पष्ट आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या निर्णयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App