सकाळी राहुल गांधी, खर्गे; सायंकाळी केजरीवाल; नितीश कुमारांच्या भेटीगाठी, विरोधी ऐक्य साधण्यासाठी की फुटीसाठी??

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आत्तापर्यंत अनेक प्रादेशिक नेत्यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न करून झाले. त्यामध्ये आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भर पडली आहे. पण त्यांचे प्रयत्न विरोधी ऐक्याचे आहेत की फुटीचे??, हे मात्र समजायला मार्ग नाही. कारण नितीश कुमार आणि तेजस्वी यादव या जोडगोळीने सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षायक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, तर सायंकाळी ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला गेले. दोन्ही भेटीनंतर नितीश कुमार यांनी सर्व विरोधकांची मोट बांधली पाहिजे आणि केंद्रातले सरकार हटविले पाहिजे असे समान मत मांडले असले तरी प्रत्यक्षात दिल्लीतल्या त्यांच्या राजकीय भेटीगाठी विरोधकांचे ऐक्य साधण्यासाठी होत्या की फूट पाडण्यासाठी होत्या??, हा प्रश्न तयार झाला आहे. Nitish Kumar meeting with rahul Gandhi and arvind kejriwal, will it work for opposition unity or disintegrty??

कारण दिल्लीच्या राजकारणात तरी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या साप – मुंगसाचे वैर आहे. ते कधीच एकत्र येत नाहीत. आणि त्यातही आता तर एक नवा राजकीय संदर्भ जोडला गेला आहे, तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आता राष्ट्रीय पार्टी बनली आहे. म्हणजेच निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे अर्थातच आम आदमी पार्टीचे हौसले बुलंद आहेत. अशा वेळी नितेश कुमार यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन त्यांना विरोधी आघाडीत सामील होण्यासाठी साकडे घालणे यात विशेष काही नाही. पण असे केजरीवालांना घातलेले साकडे राहुल गांधींना चालणार आहे का??, हा खरा प्रश्न आहे.

कारण जिथे दिल्लीच्या राजकारणात मूळातच काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांचे राजकीय हितसंबंध परस्पर हितांविरोधात जात आहेत आणि गोव्यासारख्या छोट्या राज्यात देखील आम आदमी पार्टीमुळेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. त्यावेळी आम आदमी पार्टीची साथ विरोधी ऐकण्यासाठी घेणे काँग्रेसला रुचणार आहे का??, हा प्रश्न आहे.

पवार, ममता, नितीश प्रादेशिक नेते

केंद्रीय पातळीवर काँग्रेसला कदाचित नितीश कुमार, तेजस्वी यादव, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची देखील स्पर्धा वाटत नसेल. कारण या सर्व नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कितीही राष्ट्रीय पातळीवरच्या असल्या तरी ते प्रादेशिक नेते आहेत, याची पक्की जाणीव काँग्रेसला आहे.

केजरीवाल खरे राष्ट्रीय नेते

पण अरविंद केजरीवालांच्या बाबतीत तसे नाही. केजरीवालांनी आपल्या स्वकर्तृत्वावर दिल्ली आणि पंजाब मध्ये म्हणजेच दोन राज्यांमध्ये सत्ता आणून दाखवली आहे. दोन्ही ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि भाजपचा पराभव केला आहे. अशावेळी आपल्याच राजकीय हितसंबंधाच्या विरोधात जात असलेल्या केजरीवाल यांना विरोधी आघाडीत सामील करून घेणे हे काँग्रेसला कितपत परवडेल??, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे आणि म्हणूनच भले नितीश कुमार यांनी सकाळी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन विरोधी ऐकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले असतील, पण त्यांची सायंकाळची केजरीवालांशी झालेली भेट मात्र त्या विरोधी ऐक्यावरच कुऱ्हाड मारणार का??, हा प्रश्न तयार झाला आहे.

Nitish Kumar meeting with rahul Gandhi and arvind kejriwal, will it work for opposition unity or disintegrty??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात