वृत्तसंस्था
पाटणा : Nitish Kumar बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रविवारी पाटणा जिल्ह्यातील पालीगंज भागात आयोजित दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. सिकारिया गावात त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले, तर दुल्हिन बाजार ब्लॉकमधील लाला भन्सारा गावात त्यांनी जननायक करपुरी ठाकूर पुस्तकालय भवनाचे उद्घाटन केले.Nitish Kumar
यानंतर आयोजित जनसंवाद बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या प्रगती आणि आगामी योजनांवर सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, बिहारमधील प्रत्येक घरात वीज आणि पाण्याची सुविधा पुरविण्यात आली आहे आणि रस्त्यांचे जाळे सतत वाढवले जात आहे.Nitish Kumar
रोजगाराबाबत त्यांनी मोठी घोषणा केली. नितीश कुमार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत १० लाख नोकऱ्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, जे आता ३९ लाख झाले आहे. हा आकडा लवकरच ५० लाखांच्या पुढे जाईल असा दावा त्यांनी केला.
पुढील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यास १ कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
राज्यातील प्रत्येक कुटुंबाला १२५ युनिट मोफत वीज दिली जाईल आणि ११०० रुपयांचे सामाजिक सुरक्षा पेन्शन देखील सुनिश्चित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना ते म्हणाले की, केंद्राकडून मिळालेल्या विशेष पॅकेजमुळे बिहारचा विकास वेगाने होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App