मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आढावा बैठकीला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे.
विशेष प्रतिनिधी
Bihar Politits: RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या ऑफरवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांची ऑफर फेटाळली आहे. ‘आम्ही चुकून दोनदा इकडे तिकडे फिरलो, आता आम्ही नेहमी सोबत राहू आणि विकासकामे करू,’ असे सीएम नितीश कुमार यांनी म्हटले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आढावा बैठकीला संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, ‘बिहारच्या जनतेने 24 नोव्हेंबर 2005 पासून आम्हाला काम करण्याची संधी दिली. बिहारच्या विकासासाठी आम्ही सर्व क्षेत्र आणि विभागांसाठी सतत काम करत आहोत.
2005 पूर्वी बिहारची परिस्थिती अत्यंत बिकट होती. सायंकाळनंतर लोक घराबाहेर पडण्यास घाबरत होते. रुग्णालयांमध्ये उपचाराची व्यवस्था नव्हती, रस्ते ओस पडले होते. शिक्षणाची स्थिती चांगली नव्हती. हिंदू-मुस्लिम यांच्यात अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या येत होत्या.
मुख्यमंत्री नितीश कुमार पुढे म्हणाले, ‘जेव्हा बिहारने आम्हाला काम करण्याची संधी दिली, तेव्हा बिहारची परिस्थिती बदलली. कोणाशीही भेदभाव केला नाही. आम्ही चुकून दोनदा फिरलो. आता आम्ही सदैव एकत्र राहू आणि बिहारसोबत देशाचा विकास करू. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लालूंनी नितीश यांना इंडिया ब्लॉकमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्यांच्या बाजूने दरवाजा उघडा असल्याचे सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App