Nitish Kumar : ‘नितीश कुमारांना भारतरत्न’ ; जेडीयू नेत्यांनी पाटण्यातील रस्त्यावर लावले पोस्टर

Nitish Kumar

जेडीयूच्या बिहार युनिटचे सरचिटणीस छोटू सिंग यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : Nitish Kumar  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. पाटणा येथील पक्ष कार्यालयाबाहेर नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारे अनेक पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar  ) यांचे बिहारचे विकासपुरुष आणि प्रसिद्ध समाजवादी असे वर्णन करण्यात आले आहे.Nitish Kumar



पोस्टर्समध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा फोटो आहे, त्यांच्यासोबत जेडीयूच्या सर्व मोठ्या नेत्यांचे फोटोही या पोस्टर्समध्ये लावण्यात आले आहेत. ‘बिहारचे प्रख्यात समाजवादी आणि विकासपुरुष मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्यात यावे’, असे पोस्टर्समध्ये लिहिले होते. जेडीयूच्या बिहार युनिटचे सरचिटणीस छोटू सिंग यांनी हे पोस्टर्स लावले आहेत.

जनता दल युनायटेडची आज पाटणा येथे बैठक होणार आहे. जेडीयूच्या प्रदेश कार्यालयात राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. सभेला सुरुवात होण्यापूर्वी पाटण्यातील वेगवेगळ्या चौकात पोस्टर लावण्यात आले आहेत. पोस्टच्या माध्यमातून जेडीयू नेत्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

Bharat Ratna to Nitish Kumar JDU leaders put up posters on the streets of Patna

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात