विशेष प्रतिनिधी
पुणे : कात्रज चौकात सहापदरी उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारने १६९.१५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. हा उड्डाणपूल पुणे शहर, मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग आणि पुणे-सोलापूर महामार्गाला जोडण्यात येईल .रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नुकतीच यासंदर्भात घोषणा करण्यात आली.गडकरी जे काम हातात घेतात ते पूर्णत्वास नेतात.Nitin Gadkari sanctions Rs 169.15 cr for six lane flyover at Katraj junction in Pune Maharashtra
कसा असेल हा उड्डाणपूल?
कात्रज जंक्शनवर उभारण्यात येणारा हा उड्डाणपूल 1,326 मीटर लांब आणि 24.20 मीटर रुंद असेल. पुणे-मुंबई बायपासवरुन सुरु होणारा हा उड्डाणपूल कात्रज-कोंढवा रोडवर उतरेल. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने कात्रज-कोंढवा रोडच्या रुंदीकरणाचे कामही हाती घेतले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आढळगाव ते जामखेड महामार्गाच्या दोन लेनच्या चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याची मागणी केली होती.
त्यांची ही मागणी गडकरी यांनी मंजूर केली आहे. आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी गडकरी यांनी 399.33 कोटी रुपये मंजूर केले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App