विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी इन्स्टाग्रामवर स्टार बनले आहेत. रस्त्याने जात असताना आपण त्या रस्त्याची टेस्ट कशी केली, हे सांगण्यााचा नितीन गडकरी यांचा किस्सा सांगण्याच अनोखा अंदाज यातून दिसला आहे.Nitin Gadkari becomes Instagram star, unique story telling video goes viral
आपण वेगवेगळ्या महामार्गांचं काम नीट झालं आहे की नाही, याची परीक्षा कशी घेतली, याबाबतचा किस्सा नितीन गडकरींनी या व्हिडिओत सांगितला आहे. मुंबई-पुणे हा भारतातील पहिला एक्सप्रेस हायवे नितीन गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना तयार झाला. या हायवेची टेस्ट घेण्यासाठी आपण काय युक्ती केली, ते गडकरींनी सांगितलं आहे.
आपण आपल्या गाडीत हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे मालक बसले होते. त्यावेळी आपण आपल्या ड्रायव्हरला गाडीचा वेग 140 किलोमीटर प्रतितास करायला सांगितलं आणि आपल्यासोबत असलेल्या दोन्ही कंपनीच्या मालकांना सांगितलं की आता आपण थर्मास काढून त्यातील चहा पिणार आहोत.
140 किलोमीटर वेगाने गाडी सुरू असताना जर चहाचा एक थेंबही सांडला तरी तुमची खैर नाही, असा दमच त्यांना भरला. त्यानंतर प्रत्यक्ष थर्मास काढून त्यातील चहा आपण प्यायलो, मात्र एकही थेंब खाली न सांडल्याने ती टेस्ट यशस्वी झाली.
दिल्ली मुंबई हायवेचा किस्सा सांगताना ते म्हणाले, आपण 140 किलोमीटर वेगाने गाडी चालवली होती, यावेळी हा वेग वाढवून तो आपण 180 किलोमीटर प्रतितास केला आणि तशाच प्रकारे चहा पिऊन चाचणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App