विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळात घुसून मारामारी करणाऱ्या नितीन देशमुखचा शरद पवारांच्या पक्षात सन्मान; जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पद देऊन “वाढविला” “मान”!!, असे आज घडले.
काहीच दिवसांपूर्वी नितीन देशमुख यांनी विधिमंडळात घुसून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांशी मारामारी केली होती. महाराष्ट्रात त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोघांनाही विधिमंडळाची माफी मागायला लावली होती.
पडळकर यांनी माफी मागितली. पण त्यावेळी जितेंद्र आव्हाड वेगवेगळी मखलाशी करत राहिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सकट जयंत पाटलांनाही झापले होते. पडळकर आणि आव्हाड यांच्या माफी नंतर विधानसभा अध्यक्षांनी मारामारीचे प्रकरण विधिमंडळाच्या शिस्तपालन समितीकडे पाठवले होते. त्याचा चौकशी आणि तपासाचा निष्कर्ष अद्याप हाती यायचा आहे. त्यानंतर नितीन देशमुख आणि पडळकर समर्थकांना शिक्षा होण्याची शक्यता आहे.
पण ज्याच्यामुळे एवढा सगळा राजकीय तमाशा झाला, त्या नितीन देशमुखला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिक्षा करण्याऐवजी त्याला प्रवक्ते पदी निवडून त्याचा “मान” “वाढविला”. पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात 16 प्रवक्त्यांची यादी जाहीर केली त्यामध्ये नितीन देशमुखचा समावेश केला. स्वतः नितीन देशमुखने त्याबद्दल ट्विट करून शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले. जितेंद्र आव्हाडांनी प्रवक्ते पदाच्या यादीत स्वरा भास्करचा पती फहाद अहमद, रचना वैद्य, विद्या चव्हाण अंकुश काकडे यांचाही समावेश केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App