अर्थसंकल्प सादर करताच निर्मला सीतारामन रचणार इतिहास ; मोरारजी देसाईंचा ‘हा’ विक्रम मोडणार!

जाणून घ्या, अर्थसंकल्पाचा इतिहास आणि याच्याशी निगडीत महत्त्वपूर्ण तथ्ये


विशेष प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या(मंगळवार) आर्थिक वर्ष 2024-25 साठी आपला सलग सातवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि याचबरोबर त्या इतिहासही रचणार आहेत. यामुळे त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम देखील मोडणार आहेत. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याची विक्रम आताही मोरारजी देसाई यांच्याच नावावर आहे.Nirmala Sitharaman will create history as soon as the budget is presented will break Morarji Desais record



अर्थमंत्री निर्मला सीतारामन या पुढील महिन्यात 65 वर्षांच्या होणार आहेत. त्यांना 2019मध्ये भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनवलं गेलं होतं. त्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात सलग दुसऱ्यांदा सरकार बनवलं होतं. तेव्हापासून सीतारामन यांनी यावर्षी फेब्रुवारी महिन्याती एक अंतरिमसह सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.

आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल 2024 ते मार्च 2025)चा संपूर्ण अर्थसंकल्प हा निर्मला सीतारामन यांचा सातवा अर्थसंकल्प ठरणार आहे. यामुळे त्या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा विक्रम मोडीत काढतील. देसाई यांनी 1959 ते 1964 या कालावधीत सलग पाच संपूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.

स्वतंत्र भारतामध्ये अर्थसंकल्प सादर करण्याशी संबंधित काही तथ्य पुढील प्रमाणे आहेत –

स्वतंत्र भारताचा पहिला सार्वत्रिक अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी देशाचे पहिले अर्थमंत्री आर के शनमुखम चेट्टी यांनी सादर केला होता. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि नंतर पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून एकूण 10 अर्थसंकल्प सादर केले आहेत. तर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात आठ अर्थसंकल्प सादर केले. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी 1991 ते 1995 या काळात सलग पाचवेळा अर्थसंकल्प सादर केला, जेव्हा ते पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

सर्वात प्रदीर्घ अर्थसंकल्पीय भाषण सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2020 रोजी दोन तास 40 मिनिटं दिलं होतं. वर्ष 1977मध्ये हीरुभाई मुलजीभाई पटेल यांचं अंतरिम अर्थसंकल्पीय भाषण आतापर्यंतचं सर्वात छोटं भाषण आहे, जे केवळ 800 शब्दांचंच होतं. अर्थसंकल्प परंपरेनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता सादर केला जातो. मात्र 1999 मध्ये ही वेळ बदलली गेली होती आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हापासून अर्थसंकल्प सकाळी 11 वाजता सादर केला जातो. यानंतर 2017मध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख बदलून 1 फेब्रुवारी करण्यात आली होती. जेणेकरून सकरार मार्च संपेपर्यंत संसदीय अनुमोदन प्रक्रिया पूर्ण करू शकेल.

Nirmala Sitharaman will create history as soon as the budget is presented will break Morarji Desais record

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात