इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्याचे या संघटनेचे स्वप्न आहे
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : आज (24 सप्टेंबर) राष्ट्रीय तपास यंत्रणेने हिजबुत-तहरीर या संघटनेवर मोठी कारवाई केली, जिच्यावर जगभरातील अनेक देशांमध्ये बंदी आहे. दहशतवादी कट प्रकरणी NIA संपूर्ण तामिळनाडूमध्ये हिज्बुत-तहरीरच्या ( Hizb ut-Tahrir ) 11 ठिकाणांवर छापे टाकत आहे.
एनआयएने हिजबुत-तहरीर संघटनेशी संबंधित लोकांच्या घरांची झडती घेतली. हिजबुत-तहरीर या प्रतिबंधित संघटनेत लोकांची भरती केल्याचा गुन्हा चेन्नई पोलीस विभागात दाखल करण्यात आला आहे.
या संघटनेवर लोकांचे ब्रेनवॉश केल्याचा आरोप आहे. ही संस्था तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना देशविरोधी कारवाया करायला लावण्याचे काम करते.
ही संघटना तरुणांना जिहादसाठी तयार करते. त्याचबरोबर दहशतवाद्यांना जैविक शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षणही देते. यापूर्वी मध्य प्रदेशात हिजबुत-तहरीरशी संबंधित १६ जणांना अटक करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App