पटियाला न्यायालयाने घेतला निर्णय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Tahawwur Rana मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याला १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. भारतात आणल्यानंतर त्याला पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले. पटियाला न्यायालयाने त्याला १८ दिवसांच्या रिमांडवर पाठवले. एनआयएने राणाच्या रिमांडसाठी २० दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, न्यायालयाने ते फेटाळून लावले. रिमांडच्या कारणाबाबत, एनआयएने सांगितले की चौकशीसाठी तहव्वुरची कोठडी आवश्यक आहे. Tahawwur Rana
सुनावणीदरम्यान, न्यायालयाबाहेर सीआयएसएफसह निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. राणा याला एका खास बुलेटप्रुफ वाहनातून न्यायालयात आणण्यात आले. एनआयएने अधिकृतपणे एक निवेदन जारी करून राणाच्या अटकेची घोषणा केली. निवेदनात, एजन्सीने म्हटले आहे की २००८ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी भारतात आला आहे. आम्ही यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत होतो.
एनआयए आणि रॉची संयुक्त टीम तहव्वुर राणाला घेऊन अमेरिकेहून दिल्लीला पोहोचली होती. गुरुवारी, एनआयएने राणाला अधिकृतपणे अटक केली. तहव्वूरला भारतात आणणारे विशेष विमान दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरले होते.
एनआयएला राणाकडून बरीच माहिती हवी आहे. एनआयएला दहशतवादी नेटवर्क आणि मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या लोकांबद्दल जाणून घ्यायचे आहे. राणावर डेव्हिड कोलमन हेडली, लष्कर-ए-तैयबा, हरकत-उल-जिहादी इस्लामी आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांसह २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी समुद्रमार्गे भारतात आले. त्यांनी मुंबईत अनेक ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यात एकूण १६६ लोक मृत्युमुखी पडले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App