वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केल्यानंतर NIA ने खलिस्तानी समर्थकांची नवीन यादी जारी केली आहे. NIA यादीत समाविष्ट असलेल्या सर्व लोकांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी करत आहे.NIA releases new list of Khalistani supporters; Prepare for asset forfeiture
या यादीत परमजीत सिंग पम्मा, कुलवंत मुथडा, सुखपाल सिंग, सरबजीत बेनूर, कुलवंत, गुरप्रीत सिंग, हरजप, हरप्रीत सिंग, रणजीत नीता, गुरमीत सिंग, जसमीत हकीमजादा, गुरजंत धिल्लॉन, लखबीर रोडे, अमरदीप पुरेवाल, जतिंदर डी जेतवाल, जतिंदर डी. एस हिम्मत सिंग, वाधवा सिंग (बब्बर काका) आणि जे धालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे.
काल पन्नू आणि निज्जर या अतिरेक्यांची मालमत्ता जप्त
एनआयएने शनिवारी अमृतसरच्या खानकोट गावात गुरुपतवंत सिंग पन्नूची 46 कनाल जमीन जप्त केली. ही शेतजमीन आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. त्याचे चंदीगडमधील सेक्टर 15 सी येथील घरही एनआयएने जप्त केले आहे. यापूर्वी 2020 मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कायदेशीररीत्या, पन्नू आता या मालमत्तांचा मालक नाही.
तसेच जालंधरमधील दहशतवादी निज्जरची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता आता सरकारची आहे. भारत सरकारने 2019 मध्ये पन्नूच्या SFJ संघटनेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत बंदी घातली होती. यासंबंधीच्या गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शीख जनमताच्या नावाखाली शीख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या पंजाब आणि चंदीगडमधील मालमत्ता जप्त केल्या आहेत. पन्नू हा प्रतिबंधित संघटनेचा शिख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख आहे. तो कॅनडा आणि इतर देशांना भारतविरोधी बोलत राहतो. नुकत्याच झालेल्या कॅनडा-भारत वादात त्याने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंनाही धमकावले होते.
कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या पंजाबमधील घरावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मालमत्ता जप्तीची नोटीस चिकटवली आहे. निज्जर याचे घर जालंधरच्या भारसिंहपुरा (फिल्लौर) गावात आहे. जे कुलूपबंद आहे. हरदीपसिंग निज्जरची स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी एनआयएने याचिका दाखल केल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या विशेष एनआयए न्यायालयात नातेवाईक आणि जवळचे लोक आपली बाजू मांडू शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App