टेरर फंडींगप्रकरणी 4 संशयित ताब्यात
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Jammu Kashmir एनआयएने (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) जम्मू-काश्मीर( Jammu Kashmir )आणि महाराष्ट्रात देशविरोधी कारवायांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात छापे टाकले आहेत. एनआयएने छापेमारीनंतर 4 संशयितांना ताब्यात घेतले. या चार संशयितांची चौकशी सुरू आहे.Jammu Kashmir
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे चौघेही दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. एनआयएने जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. टेरर फंडींग विरोधात कारवाई करत NIA ने जवळपास 22 ठिकाणी छापे टाकले आहेत.
एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे छापे टाकले आहेत. दहशतवादी घटनांचा तपास करण्यासाठी हा छापा टाकण्यात आला. यासोबतच राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसामसह जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्रात एनआयएचे छापे सुरू आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या टेरर फंडिंग संदर्भात हा छापा टाकण्यात आला आहे.
यापूर्वी NIA ने 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कारवाई केली होती. हे प्रकरण पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आहे. एनआयएने 2021 विशाखापट्टणममध्ये एका प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांवर कारवाई केली होती. या छाप्यात एनआयएने संशयितांचे मोबाईल फोन आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथील निवडणूक अगदी जवळ आली आहे. अशा परिस्थितीत देशविरोधी कारवायांशी संबंधित निधीची प्रकरणे समोर आली आहेत. एनआयए या प्रकरणांवर कारवाई करत आहे. चारही संशयितांची चौकशी सुरू आहे. प्रत्येक प्रकारची माहिती गोळा केली जात आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. येथे निवडणुका झाल्या आहेत. 8 तारखेला निकाल लागणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App