मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे

NIA Raids 18 Locations in Delhi UP Jammu and Kashmir to Bust Team Behind ISIS Led Secret Jihadi Magazine

NIA Raids : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरसह 18 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. यामुळे एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा झाला आहे. अलीकडेच 10 ऑक्टोबर रोजी लष्कर, जैश, हिजबुल, अल-बद्र आणि इतर दहशतवादी मोड्यूलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात असे लिहिले आहे की, हे सर्व दहशतवादी मॉड्यूल खोऱ्यात एकत्र कट रचत आहेत. NIA Raids 18 Locations in Delhi UP Jammu and Kashmir to Bust Team Behind ISIS Led Secret Jihadi Magazine


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरसह 18 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. यामुळे एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा झाला आहे. अलीकडेच 10 ऑक्टोबर रोजी लष्कर, जैश, हिजबुल, अल-बद्र आणि इतर दहशतवादी मोड्यूलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात असे लिहिले आहे की, हे सर्व दहशतवादी मॉड्यूल खोऱ्यात एकत्र कट रचत आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणा जम्मू-काश्मीरमध्ये ‘व्हॉइस ऑफ हिंद’ नावाच्या ऑनलाइन मासिकाच्या मागे इसिसच्या नेतृत्वाखालील टीमचा पर्दाफाश करण्याच्या उद्देशाने छापे टाकत आहे. इसिस फेब्रुवारी 2020 पासून ‘द व्हॉईस ऑफ हिंद’ (VOH) नावाचे एक ऑनलाइन भारत केंद्रित मासिक प्रकाशित करतेय. हे मासिक मुस्लिम तरुणांना मोठ्या प्रमाणावर धर्मांधतेच्या दलदलीत ढकलण्याचे काम करत आहे.

एनआयए गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांचे अड्डे आणि त्यांचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे घालत आहे. रविवारीदेखील राष्ट्रीय एजन्सीने काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आणि द रेझिस्टन्स फ्रंट (टीआयएफ) च्या दोन सदस्यांना अटक केली.

टीआरएफ ही प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबा गटाची आघाडीची संघटना असल्याचे मानले जाते. काश्मीर खोऱ्यात नुकत्याच झालेल्या नागरिकांच्या टारगेट किलिंगची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली आहे.

एनआयएच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू -काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने कुलगाम, श्रीनगर आणि बारामुल्ला जिल्ह्यात सात ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्याचवेळी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एनआयएचे छापे जम्मू -काश्मीर व्यतिरिक्त दिल्ली, उत्तर प्रदेशातही पडले आहेत.

एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले की, छाप्यांदरम्यान बारामुल्लाचा तौसीफ अहमद वानी आणि वम्पुराचा फैज अहमद खान या दोन टीआरएफ सदस्यांना दहशतवादी कारवायांच्या कटात सामील असल्याबद्दल अटक करण्यात आली. छाप्यात मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, इतर संशयास्पद साहित्य यासह अनेक डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली.

NIA Raids 18 Locations in Delhi UP Jammu and Kashmir to Bust Team Behind ISIS Led Secret Jihadi Magazine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात