तहव्वुर राणाला तळमजल्यावरील १४x१४ च्या कोठडीत ठेवण्यात आले आहे,
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: Tahawwur Rana २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक तहव्वुर राणा (६४) याला एनआयए मुख्यालयातील अत्यंत सुरक्षित कक्षात ठेवण्यात आले आहे. राणाभोवती कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राणावर सीसीटीव्हीद्वारे २४ तास लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय, सुरक्षा कर्मचारीही कडक पहारा देत आहेत. लोधी रोडवरील एनआयए मुख्यालयाला बहुस्तरीय सुरक्षा देण्यात आली आहे.Tahawwur Rana
तहव्वुर राणाला तळमजल्यावरील १४x१४ च्या कोठडीत ठेवण्यात आले आहे, असे एका सूत्राने सांगितले. त्याने स्वतःला इजा करून नये म्हणून त्याला फक्त सॉफ्ट-टिप पेन वापरण्याची परवानगी असेल. शिवाय राणा आत्महत्या करणार याचीही दक्षात बाळगली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एनआयएने दहशतवादी हल्ल्यामागील मोठे कट उघड करण्यासाठी राणाची चौकशी सुरू केली. चौकशीत त्याचे आयएसआयशी असलेले संबंध आणि भारतातील स्लीपर सेल, विशेषतः त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद गिलानीशी असलेले संबंध यावर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेडलीवर पुष्कर, गोवा, दिल्ली आणि इतर ठिकाणी स्लीपर सेलमध्ये भरती करण्याचा संशय आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App