वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल परदेशात गाजले आहेत. विविध वृत्तपत्रांनी या निकालाच्या बातम्या आवर्जून दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियतेचे कौतुक केलं आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोदी यांचे उत्तराधिकारी असल्याचे म्हंटले आहे.News of the results of five foreign states; Modi’s popularity, Yogi’s Jalwa
अमेरिका, पाकिस्तान, नेपाळ , ब्रिटनमधील दैनिकानी निकालावर भाष्य केले आहे. नेपाळ दैनिकाना पंजाबमधील आपच्या विजयाचे अप्रूप वाटले आहे.
पाकिस्तानातील एक्सप्रेस ट्रिब्यून आणि डॉन यांनी निवडणुकीच्या बातम्या दिल्या आहे.एक्सप्रेस ट्रिब्यूनने उत्तर प्रदेशातील निवडणुकीला जास्त महत्व दिले. आगामी लोकसभा निवडणुकीची चाहूल असल्याचे म्हंटले आहे. योगी आदित्यनाथ यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे.
द डॉनने देखील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल असेच लागतील, असे भाकीत केले आहे. मोदी यांची लाट कायम असल्याचे म्हंटले आहे.
न्यूयॉर्क टाइम्स (अमेरिका) ने म्हंटले कि , योगी हे ३० वर्षांच्या इतिहासात दुसऱ्यांदा सरकार बनविणारे एकमेव ठरले आहेत. मोदी यांचे ते उत्तराधिकारी आहेत. मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्या तरी ते सहज सत्ता स्थापित करतील.
वॉशिंगटन पोस्ट (अमेरिका) ने म्हंटले कि, मोदी यांची लोकप्रियता वाढत आहे. भाजपच्या विजयाचा रथ कोणालाच रोखता येणार नाही. भारताचा प्रवास आता हिंदू राष्ट्राच्या दिशेने होणार आहे. योगी बहुमताची सरकार स्थापन करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App