रामनाथपुरमची निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींच्या दक्षिण दिग्विजयाच्या बातम्या; सत्य किती?, तथ्य काय?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विरोधकांनाच नव्हे, तर संपूर्ण देशवासीयांना राजकीय सरप्राईज देण्यात माहीर मानले जातात. हे सरप्राईज फक्त माध्यमांनाच समजत नाही असे नाही, तर ते खुद्द भाजप मधल्या अतिवरिष्ठ नेत्यांच्या सुद्धा लक्षात येईल याची गॅरंटी नसते. तरी देखील मोदींच्या राजकीय सरप्राईज विषयी प्रसार माध्यमे वेगवेगळ्या अटकळी बांधत असतात. अशीच मोदींच्या राजकीय सरप्राईजची एक अटकळ प्रसार माध्यमांनी सध्या बांधली आहे, ती म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी हे तामिळनाडूतील रामनाथपुरम या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, ही होय. प्रसार माध्यमांच्या मते हे मोदींचे सरप्राईज असू शकते. PM Narendra Modi may contest from ramnathpuram, but the real target is to increase vote percentage of BJP beyond 50 %

 अयोध्या ते रामनाथपूरम

2024 च्या जानेवारीत अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मोदींची लोकप्रियता शिगेला पोहोचली असेल आणि त्याचवेळी दुसरे रामस्थान रामेश्वर ज्या मतदारसंघात येते, त्या रामनाथपूरम मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली तर त्याचा दक्षिणेतल्या सर्व राज्यांमध्ये फार मोठा फायदा होईल, असा भाजपच्या नेतृत्वाचा राजकीय होरा असल्याचे प्रसार माध्यमांच्या बातम्यांमध्ये नमूद आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे तर्क दिले आहेत. रामनाथपूरम हा मतदारसंघ अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायाचे बाहुल्य असणारा आहे. तेथे द्रमूक, मुस्लिम लीग अथवा अण्णाद्रमुक पक्षाचे मुस्लिम खासदार राहिले आहेत. पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता दक्षिण भारतात एन्कॅश करायची असेल, तर रामनाथपूरम सारखा दुसरा मतदारसंघ नाही. रामनाथपूरम हे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जन्मस्थान आहे. त्याचा लाभ भाजपला मिळू शकतो, असे भाजप मधल्या काही सूत्रांचे म्हणणे असल्याचे माध्यमांच्या बातम्यांमध्ये नमूद केले आहे.

काशी – तमिळ संगम

काहीच दिवसांपूर्वी वाराणसीत झालेला काशी – तमिळ संगम या कार्यक्रमाचा संबंध देखील माध्यमांनी मोदींच्या रामनाथपूरम मधल्या संभाव्य लोकसभा निवडणुकीशी जोडला आहे.

अर्थात हे झाले माध्यमांच्या अटकळींचे भाग. पण या बातम्यांमध्ये तथ्य किती हे प्रत्यक्ष मोदी, अमित शाह किंवा जे. पी. नड्डाच सांगू शकतील. या खेरीज अन्य कोणाला त्याची फारशी माहिती असण्याची शक्यता फार धूसर आहे.



144 मतदार संघांवर लक्ष

पण भाजपच्या 2024 च्या मोहिमेच्या बाबतीत एक बाब निश्चित आहे, ती म्हणजे भाजप अत्यंत बारकाईने लोकसभा निवडणुकीचे प्लॅनिंग करत आहे. भाजपने देशाच्या लोकसभा निवडणूक इतिहासात कधीही न जिंकलेल्या 144 मतदारसंघांवर कॉन्सन्ट्रेशन केले आहे. यासाठी सर्व केंद्रीय मंत्री प्लॅनिंग सह भाजपने मैदानात उतरवले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बारामती, छिंदवाडा सारखे हाय प्रोफाईल मतदारसंघ तर आहेतच, पण प्रामुख्याने दक्षिण भारतातील मतदार संघ आहेत, जिथे भाजपचे राजकीय संघटन अजूनही प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत कमकुवत आहे.

2024 च्या निवडणुकीत निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिण भारतातले भाजप संघटन मजबूत करणे हा महत्त्वाचा इरादा आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील काही विशिष्ट प्रादेशिक पक्षांमुळे म्हणजे नितीश कुमार, अकाली दल यांच्यामुळे जे थोडेफार नुकसान होणार आहे, ते नुकसान दक्षिण भारतातून भरून काढण्याची भाजपची योजना आहे.

50 % + मते मिळवण्याचे मूळ टार्गेट

पण त्या पलिकडे भाजप अत्यंत महत्त्वाचे प्लॅनिंग करतो आहे, ते म्हणजे मतांच्या टक्केवारीचे गणित जमवून आणणे हे होय. गुजरात विधानसभा निवडणुकीत याची चुणूक दिसली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला विक्रमी 154 जागा मिळाल्या असल्या तरी त्या 154 जागांचे रहस्य भाजपच्या मतांच्या टक्केवारीत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत तब्बल 54% मते भाजपने मिळवली आहेत. याचा अर्थ भाजपचे मूळ प्लॅनिंग 2024 च्या निवडणुकीत सुद्धा एकूण मतदानाची टक्केवारी 50% पेक्षा पुढे मिळवण्याचे असणार आहे. भाजप एकूण मतदानात 50 % च्या पुढे गेला, की त्याचे 350 + जागांमध्ये रूपांतर होणे अपरिहार्य आहे. त्यामुळे फक्त जागांच्या संख्येबाबत कॉन्सन्ट्रेटेड लढाई लढण्यापेक्षा भाजपचा मतदानाच्या टक्केवारीची लढाई लढण्याचा पक्का इरादा आहे आणि पक्षाच्या वाढीच्या दृष्टीने हे सर्वात मोठे टार्गेट आहे. मग त्यासाठी मोदी दक्षिणेतून लढोत अथवा उत्तरेतून. पूर्वेतून लढोत अथवा पश्चिमेतून. मूळ टार्गेट मोदींनी कुठून निवडणूक लढविणे हे नाहीच. मूळ टार्गेट भाजपची मतदानाची एकूण टक्केवारी 50 % च्या वर गेली पाहिजे, हे आहे!!

 पॅन इंडिया पक्षाचे हिंदुत्ववाद्यांचे स्वप्न

या अर्थाने भाजपला पॅन इंडिया पक्ष बनवण्याची संधी नेतृत्वाला घ्यायची आहे. सर्वदूर पसरलेला आणि जनतेत राजकीय विचार प्रणाली रुजलेला संपूर्ण भारतव्यापी पक्ष तयार करणे हे हिंदुत्ववाद्यांचे फार पूर्वीपासून म्हणजे 1920 पासूनचे स्वप्न आहे. भाजपच्या सध्याच्या यशस्वी वाटचालीच्या निमित्ताने हे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक हा या स्वप्नातला महत्त्वाचा माइल स्टोन असणार आहे. मोदी रामनाथपुरम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात या बातमीतले हे मूलभूत तथ्य आणि सत्य आहे!!

PM Narendra Modi may contest from ramnathpuram, but the real target is to increase vote percentage of BJP beyond 50 %

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात