विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : न्यूयॉर्क टाईम्सच्या विकृत पत्रकारितेने पुन्हा एकदा भारताच्या कोरोनाविरुध्दच्या लढाईत अडथळा आणत द्वेषमूलक लेख लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या आशावादी वातावरणाशी सुसंगत निष्कर्ष आयसीएमआरने काढले असे या लेखात म्हटले आहे.New York Times distorted anti-India journalism seeks to disrupt India’s fight against Corona
भारत कोरोनाविरुध्दच्या लढाईत उत्कृष्ठ कामगिरी करत असताना या प्रयत्नांना अडथळे आणणारा आणि गैरसमज पसरविणारा लेख न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आला आहे. हे अत्यंत गैर आहे, असे भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.
या लेखात असा दावा करण्यात आल आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबत भारतीयांमध्ये आशावादी वातावरण तयार केले. आयसीएमआरने या वातावरणाला सुसंगत निष्कर्ष जाहीर केले. कोरोनाच्या संकटाकडे आयसीएमआरकडून दूर्लक्ष करण्यात आले.
डॉ. बलराम भार्गव म्हणाले, पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, हा प्रक्षोभक ¸फ¸आणि द्वेषमूलक लेख आहे. मुद्दामहून लक्ष वेधऊन घेण्यासाठी हा लेख लिहिला आहे. कोरोनाविरुध्द भारत चांगले करत असताना आणि लसीकरणाच्या पातळीवर उत्कृष्ठ कामगिरी करत असताना मुद्दामहून हा लेख लिहिला गेला आहे. केवळ लक्ष विचलित करणे त्याचा उद्देश आहे. या लेखात मांडलेले सर्व मुद्दे हे गैरलागू आहेत.
आम्ही पत्रकारिता आणि संपादकीय स्वातंत्र्याची खूप कदर करतो. त्याच वेळी आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे की केंद्र सरकार तसेच राज्य सरकारे एका साथीच्या आजाराशी पूर्ण ताकदीनिशी लढत आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.
भूषण म्हणाले, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्य नसलेल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे न्यूयॉर्क टाईम्सच्या या विकृत लेखाचा आम्ही निषेध करतो. यापुढे असे होऊ नये अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App