जेएनयूच्या नूतन कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी फाडला डाव्यांचा बुरखा, जेएनयूमध्येच शिजले आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र

आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र जवाहरलाला नेहरू विद्यापीठातच (जेएनयू) शिजले असल्याचा आरोप नूतन कुलगुरू शांतीश्री पंडीत यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रवादी दृष्टीकोन असल्यानेच आपल्याला बदनाम केले जात आहे. उपेक्षित समाजातून आलेली एक महिला जेएनयूच्या कुलगुरूपदी आल्याचे त्यांना सहनच होत नसल्याचेही पंडित यांनी म्हणले आहे.New Vice Chancellor of JNU Shantishri Pandit tears off leftist veil, conspiracy to defame her


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र जवाहरलाला नेहरू विद्यापीठातच (जेएनयू) शिजले असल्याचा आरोप नूतन कुलगुरू शांतीश्री पंडीत यांनी केला आहे. भारतीय राष्ट्रवादी दृष्टीकोन असल्यानेच आपल्याला बदनाम केले जात आहे. उपेक्षित समाजातून आलेली एक महिला जेएनयूच्या कुलगुरूपदी आल्याचे त्यांना सहनच होत नसल्याचेही पंडित यांनी म्हणले आहे.

इंडीयन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना पंडित म्हणाल्या, जामिया मिलिया इस्लामिया आणि सेंट स्टीफन्स कॉलेजला सांप्रदायिक अड्डे असे म्हणणारे आणि भारतीय ख्रिश्चनांसाठी अपशब्द वापरत नागरी हक्क कार्यकर्त्यांचे मानसिकदृष्ट्या आजारी जिहादी असे वर्णन केल्याचे ट्विट पंडीत यांच्य नावाने केले गेले आहे. यावर त्या म्हणाल्या, माझे ट्विटर अकाऊंटच नाही. त्यामुळे मी अशा प्रकारचे ट्विट करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेएनयूमधीलच कोणाचे तरी हे षडयंत्र आहे. याचे कारण म्हणजे मी पहिली महिला कुलगुरू झाल्याने अनेक जण नाराज आहेत.

सोशल मीडियावर आपण अजिबात सक्रिय नाही असे सांगताना पंडीत म्हणाल्या, माझी मुलगी सायबर-सुरक्षा अभियंता आहे. सहा वर्षांपूर्वी, तिने माझे सोशल मीडिया अकाऊंट बंद केले. कारण त्यावेळी ती अमेरिकेत नोकरीसाठी अर्ज करत होती. तिने मला सांगितले होते की आई, तू कोणत्याही सोशल मीडिया साइटवर जाणार नाहीस. त्यामुळेच जेव्हा ट्विटरवर माझ्या नावाने काहीतरी फिरतेय हे मला माहितच नव्हते. त्याबद्दल मला कोणीही माहिती दिली नाही.

माध्यमांकडून मला अत्यंत वाईट वागणूक का दिली जात आहे, मी काय पाप केले असा संतप्त सवाल करून पंडित म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाव्यांची सद्दी संपविली. त्यांचा बुरखा फाडला. त्याची शिक्षा मला दिली जात आहे. मी तामीळनाडू राज्यातील उपेक्षित वर्गातील महिला आहे. आत्तापर्यंत ७० वर्षे डावे सत्तेवर होते. जेएनयू हा त्यांचा अड्डा होता. मात्र, त्यांनी कधीही महिला कुलगुरूची नियुक्ती केली नाही. माझी नियुक्ती झाल्यावर सर्व बाजुंनी हे लोक हल्ला करत आहेत. याचे कारण माझा दृष्टीकोन पूर्णत: भारतीय आहे. त्यांनी आत्तापर्यंत चुकीचा इतिहास लिहिला. अजेंडा ठरवून सोईचे लिहिले. चोल, मराठा, विजयनगर साम्राज्य, चेर, पांड्या इतिहासात आहेत कुठे आहेत? कारण त्यांना आपला अजेंडा सेट करायचा होता. आता हा इतिहास दुरुस्त करण्यात गैर काय आहे? मी दक्षिण भारतीय आहे; मला वाटते की राजेंद्र चोल हा भारतातील सर्वात महान सम्राट आहे. त्याने इंडो-पॅसिफिक जिंकले, चिनी लोकांचा समावेश केला. त्याचा उल्लेख आपल्या इतिहासात का नाही? मात्र असे प्रश्न विचारल्यावर मी या तथाकथित डाव्यांची शत्रू बनते.

अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेश देताना नियमांचे पालन न केल्याबद्दल चौकशीत दोषी आढळल्यानंतर आपल्याला कारवाईला सामोरे जावे लागले होते का? सांगून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मंत्रालयाला दोषी असल्याचा अहवाल दिला होता या प्रश्नावर पंडीत म्हणाल्या, माझी बाजूच समजून घेतली नाही. मी दोषी होते तर माझ्याविरुध्द एकही एफआयआर का नोंदविला नाही. कोणत्या पोलिस स्टेशनमध्ये माझ्यावर एफआयआर दाखल आहे हे दाखवा. यामध्ये पुणे विद्यापीठाने अस्मितेचे राजकारण केले. मॅनेजमेंट कौन्सिलच्या निवडणुकीत जिंकलेली मी एकमेव बिगर महाराष्ट्रीयन होतो. मग मला कोणतेही पद मिळू नये यासाठी माझ्याविरुध्द कट करण्यात आला. हे सगळे आपला छळ करण्यासाठी केले गेले.

आपण जेएनयूच्या माजी विद्यार्थी आहोत. जेएनयू माझ्यासाठी आई आहे. आज मी जी काही आहे ती जेएनयूमुळेच आहे असे सांगून पंडित म्हणाल्या, आपण लोकशाही प्रक्रिया मानत नाही का? एकाद्या मताशी असहमत असण्यास आपण सहमती का देत नाही. विचारधारा भिन्न असू शकत नाहीत का?

New Vice Chancellor of JNU Shantishri Pandit tears off leftist veil, conspiracy to defame her

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात