विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Nitin Naveen Sinha अनेकदा राजकीय धक्का देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्व कालच्या भाजपने आज नवीन धक्का दिला. देशभरात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना भाजपच्या संसदीय मंडळाने 45 वर्षांच्या नितीन नवीन सिन्हा यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक आणखी किती काळ पुढे ढकलली जाणार याविषयी देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.New shock from BJP; 45-year-old Nitin Naveen Sinha appointed as BJP’s National Working President!!
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त झालेले नितीन नवीन सिन्हा नेमके आहेत तरी कोण??, याचा सर्च सोशल मीडियावर सुरू झाला.
– बिहारमध्ये मंत्री ते थेट राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष
नितीन नवीन सिन्हा हे बिहारच्या नितीश कुमार मंत्रिमंडळात नुकतेच मंत्री झालेत. ते भाजपचे ज्येष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र असून ते बिहारच्या बंकीपूर मधून चार वेळा विधानसभेवर निवडून आले. ते 2025 च्या निवडणुकीत पाचव्यांदा बिहार विधानसभेवर निवडून आल्यानंतर भाजपने त्यांची निवड नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात केली.
परंतु भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेवढी म्हणून नावे समोर आली, त्यामध्ये नितीन नवीन सिन्हा हे नाव अजिबातच समोर आलेले नव्हते. परंतु भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाने अचानकपणे मोठा राजकीय धक्का देत नितीन नवीन सिन्हा यांना बिहारच्या प्रादेशिक राजकारणातून बाजूला काढून थेट राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात आणले एवढेच नव्हे तर भाजप सारख्या बलाढ्य पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नियुक्त केले. त्यामुळे देशभरातल्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App