वृत्तसंस्था
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. कारवाईत दहशतवादी ठार केले जात आहेत. सीमेवर जगता पहारा आणि दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश दिल्यामुळे हिवाळ्यात शस्त्रे कशी पुरवायची ? असा पेच पाकिस्तानातील त्यांच्या आकासमोर उभा आहे. यावर तोड म्हणून पिस्तूल आणि हातबॉम्ब सारखी छोटी शस्त्रे पुरविण्याचा प्लॅन त्यांनी आखला असल्याचे वृत्त आहे. New plan for terrorists in Kashmir? ; AK 47 Instead of pistols, grenades in the hands of stone thrower
एका गुप्तचर खात्याच्या अहवालानुसार छोटी शस्त्रे पुरविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हा कट रचला आहे. त्यासाठी आयएसआयने विश्वासार्ह दहशतवाद्यांची टीम बनवली आहे. गुप्तचर रिपोर्टनुसार, काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यापूर्वी तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास प्रवृत्त करण्याची योजना आहे. खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या तरुणांच्या हातात जसे दगड देत होते.त्यात बदल करुन दगडांऐवजी हातबॉम्ब देण्याची योजना आखली आहे. एके४७ ऐवजी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि ग्रेनेड सारखी छोटी हत्यारे नवीन भरती झालेल्यांच्या हातात देण्याची तयारी केली जात आहे.
लष्कराच्या कारवाईत ठार होण्याच्या धास्तीने अनेक तरुण दहशतवाद सोडून मूळ प्रवाहात सामील होत आहेत. तसेच कुटुंब आणि लष्कराच्या घरवापसी या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक तरुणांनी दहशतवादाचा त्याग केला आहे. त्यामुळे ही पाकिस्तानसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांनी तरुणाना दहशतवादाचा जंजाळात अडकून ठेवण्यासाठी त्यांना पिस्तूल आणि ग्रेनेड देण्याचे षडयंत्र रचले आहे. त्याद्वारे त्यांचा घरवापासीचा मार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच शस्त्रसाठा अनंतनाग आणि अनेक ठिकाणी पाठवला आहे. ज्यामध्ये २० ग्रेनेड आणि ५ पिस्तूल आढळली होती. उरीमध्ये लष्कराने लहान शस्त्रे आणि ग्रेनेड जप्त केली आहे. ८० ग्रेनेड आणि ७ पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर देखील जप्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App