विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : नव्या संसदेत लोकसभा सभागृहात दोन तरुण उड्या मारून घुसले. त्यामुळे संसदेच्या सुरक्षेचा मोठा भंग झाला. त्यावर गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी विरोधक मात्र राजकारणातच दंग झाल्याचे दिसत आहेत. New Parliament building not as secured as the old one
लोकसभेत शून्य काळात दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या. त्यांनी त्यांच्या समावेत स्मोक गन आणल्या होत्या. त्यातून त्यांनी पिवळा लाल धूर लोकसभेत सोडला. संसदेवरील हल्ल्याची हल्ल्याचा स्मृतीदिन असताना ही सुरक्षाभंगाची गंभीर घटना घडली. परंतु, त्यावर गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी विरोधक राजकारणातच दंग असल्याचे दिसले.
तृणमूळ काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी ज्या खासदाराच्या पासवर्ड हे दोन तरुण लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत आले होते, ते भाजपचे म्हैसूरचे खासदार प्रतापराव सिंहा यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्या तरुणांबरोबरच खासदारांनाही अटक करावी, असा कांगावा कल्याण बॅनर्जींनी केला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लाचखोरी करून लोकसभेत प्रश्न विचारल्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द झाली. त्याचा राजकीय सूड आजच्या संसदेच्या सुरक्षाभंगातून घेण्याचा प्रयत्न खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला.
तर नव्या संसदेच्या सुरक्षारचनेवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची संधी घेतली. जुनी संसद जेवढी सुरक्षित होती, तेवढी नवी संसद सुरक्षित नाही, असा कांगावा शशी थरूर यांनी केला.
कठोर उपायांसाठी सरकारचे विचार मंथन
प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्थेत नेमकी कोणती चूक झाली??, जे तरुण लोकसभेत घुसले होते त्यांचे हेतू काय होते?? याविषयीची चौकशी आणि तपास अजून सुरू आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन आज दुपारी 4.00 वाजता सर्वपक्षीय बैठक घेतली उद्या सकाळी 11.00 वाजता आणखी एक उच्चस्तरीय बैठक बोलविली आहे. सुरक्षाभंगाची गंभीर दखल घेऊन त्यावर कायमची कठोर उपाययोजना करण्याचे सरकार आणि प्रशासकीय पातळीवर विचार मंथन सुरू आहे. परंतु विरोधक मात्र राजकीय सूड उगवणे आणि नव्या संसदेच्या सुरक्षारचनेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे यात दंग झालेले दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App