नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा वाद : इंदिरा, राजीव गांधी काही उद्घाटने करू शकतात, तर मोदी का नाही??; सरकारचा काँग्रेसला सवाल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट यांनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाचा वाद सुरू केल्यानंतर केंद्र सरकारकडून केंद्रीय नागरिक विकास मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी त्यात उडी घेतली आहे. त्यांनी या वादाच्या मुद्द्यावर काँग्रेसला लख्ख आरसा दाखवला आहे.New Parliament Building: Indira, Rajiv Gandhi can do some inaugurations, why not Modi??; Government’s question to Congress

नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिली 28 मे 2023 रोजी होणार आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी करू नये, तर ते राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी भूमिका राहुल गांधी आणि त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी तर उद्घाटन समारंभावर बहिष्काराची भाषा वापरली.



पण आता या मुद्द्यावर हरदीप सिंह पुरी यांनी काँग्रेसला खडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे 1975 मध्ये इंदिरा गांधींनी पार्लमेंट एनेक्स इमारतीचे उद्घाटन केले. 15 ऑगस्ट 1987 रोजी राजीव गांधींनी पार्लमेंट लायब्ररीचे उद्घाटन केले होते. हे दोघेही त्या त्या वेळी पंतप्रधान होते. म्हणजे सरकारचे प्रमुख होते. त्यांनी पार्लमेंटशी संबंधित इमारतींचे उद्घाटन केले तर काँग्रेसवाल्यांना चालते, मग आत्ताच्या सरकार प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसदेच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले तर काँग्रेसवाल्यांना का दुखते??, असा परखड सवाल हरदीप सिंह पुरी यांनी केला आहे.

त्याच वेळी त्यांनी सोनिया गांधींवर ही जोरदार टीका केली आहे. यूपीए सरकारच्या काळात तर सोनिया गांधी या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाच्या मानल्या जायच्या. पण तो त्यांचा अंतर्गत मामला होता त्यात मी पडणार नाही. पण संसदेच्या पण नव्या संसद भवनाचे उद्घाटन सध्याच्या सरकार प्रमुखाने करण्यात गैर नाही, असा स्पष्ट निर्वाळा हरदीप सिंह पुरी यांनी दिला.

New Parliament Building: Indira, Rajiv Gandhi can do some inaugurations, why not Modi??; Government’s question to Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात