CoWin Portal : भारतात 18 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नुकतेच कोविन पोर्टलमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारीनंतर त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. वास्तविक, ज्या लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती, परंतु काही कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत, त्यांनाही लस घेतल्याचे संदेश येऊ लागले होते. त्यांच्या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पोर्टलमध्ये बदल केला आहे. New Changes In CoWin Portal, Citizens Have Options To Choose Vaccines, OTP Must for Vaccination
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात 18 वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नुकतेच कोविन पोर्टलमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारीनंतर त्यात बरेच बदल करण्यात आले आहेत. वास्तविक, ज्या लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती, परंतु काही कारणास्तव ते जाऊ शकले नाहीत, त्यांनाही लस घेतल्याचे संदेश येऊ लागले होते. त्यांच्या तक्रारीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पोर्टलमध्ये बदल केला आहे.
या नवीन बदलाअंतर्गत लस नोंदणीनंतर जर तुम्ही अपॉईंटमेंट बुक केली तर तुमच्या मोबाइल नंबरवर चार अंकी ओटीपी येईल. हा ओटीपी तुम्हाला लसीकरण केंद्रावर दाखवावा लागेल. यामुळे हे अपॉइंटमेंट तुम्हीच बुक केल्याची पडताळणी होईल. यामुळे लसीकरणाच्या डेटामध्ये कोणतीही गडबड होणार नाही.
खरं तर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे तक्रारी येत होत्या की ज्यांनी लसीकरणासाठी अपॉईंटमेंट बुक केले आहे, पण जाऊ शकले नाही अशा लोकांनाही लसी घेतली असल्याचा संदेश मिळाला आहे. त्यांना लसीचे प्रमाणपत्रही देण्यात आले. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, हे लसीकरण कर्मचार्यांनी चुकून कोव्हिन पोर्टलवर केलेल्या नोंदणीमुळे घडले आहे.
ओटीपीव्यतिरिक्त कोविन पोर्टलचा डॅशबोर्डही बदलला आहे. आता तुम्ही अपॉइंटमेंटसाठी पिनकोड किंवा जिल्हा टाकाल तेव्हा तुमच्यासमोर 6 नवीन पर्याय दिसतील. या पर्यायांद्वारे तुम्ही वयोगट (18+ किंवा 45+), लसीचा प्रकार (कोव्हिशील्ड किंवा कोव्हॅक्सिन), विनामूल्य किंवा सशुल्क लस निवडण्यास सक्षम असाल. हा बदल होण्यापूर्वी लस घेतल्यावर संदेश आल्यानंतर कळाये की, आपल्याला कोणती लस मिळाली आहे. परंतु या सुविधेद्वारे तुम्हाला आधीपासूनच सर्व माहिती मिळेल. वास्तविक, बर्याच जणांची अशी मागणी होती की, आम्हाला कोणती लस हवी आहे ते निवडण्याचा अधिकार देण्यात यावा. हा बदल केल्यानंतरच. आता तुम्हाला कोणती लसी कुठे आणि कशी मिळेल याबद्दल माहिती मिळणार आहे. तेव्हा त्यानुसार आपण स्वत:साठी स्लॉट बुक करू शकाल.
New Changes In CoWin Portal, Citizens Have Options To Choose Vaccines, OTP Must for Vaccination
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App