विशेष प्रतिनिधी
मुंबई: नेटफ्लिक्स वरील स्कविड गेम ही सर्वायवल थ्रिलर सिरीज खूपच लोकप्रिय होत आहे. प्रेक्षकांनी या सिरिजला अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या सीरिजमधील पात्र ही एक सर्वायवल गेम खेळताना दिसत आहेत. सुरुवातीला वाटतं की हा लहान मुलांचा खेळ आहेNetflix thriller ‘Squid Game’ fame Indian actor Anupam Tripathi facts
. पण जशी खेळाला सुरुवात होते, हा गेम हिसंक आणि भयानक होत जातो. जिंका किंवा मरा अशी परिस्थिती येते. साऊथ कोरियातील गरीब आणि कर्जबाजारी लोकांचा एक ग्रुप हा गेम खेळण्यासाठी भाग घेतो. कारण जो कोणी हा गेम जिंकेल, त्याला ४५ बिलियन एवढी रक्कम मिळेल.
या सीरिजमध्ये एका भारतीय अभिनेत्याने काम केले आहे. अनुपम त्रिपाठी असे त्याचे नाव असून अब्दुल अलीचा रोल या अभिनेत्याने साकारला आहे. त्यामुळे या सिरीजबरोबरच अनुपचची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याचे पात्र पाकिस्तानमधील स्थलांतरित झाले असून आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी या खेळात सहभागी झाले आहे.
तर जाणून घेऊया अनुपम त्रिपाठी बद्दल काही फॅक्ट्स
१: अनुपम हा मूळचा दिल्लीतील असून त्यानी आपले गायनाचे वर्ग २००६ साली सुरू केले. त्यानंतर २०१० मध्ये स्कॉलरशिप मिळाल्यानंतर अनुपमने साऊथ कोरियामध्ये येऊन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली. कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्याने साउथ कोरियामध्येच राहण्याचे ठरवले आणि विविध कोरियन ड्रामा शोज केले.
२: अनुपमने २०१४ साली Ode to My Father या सिनेमातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने Descendents of the Sun (2016) आणि Hospital playlists (2020) या कोरियन ड्रामास मध्ये छोट्या भूमिका साकारल्या.
३: अनुपमला भाषेच्या अडचणी तसेच काही सांस्कृतिक बदल या आव्हानांना सामोरे जावे लागले. अनुपमसाठी हे खूपच अवघड होते पण त्यानी स्वतःलाच असे आव्हान दिले होते कि आता आपण जर इथपर्यंत आलो आहे तर आपण मागे हटू शकत नाही. हे त्यानी एका वृत्तसंस्थेला सांगितले होते.
४: अनुपमने काही नाटक निर्मिती संस्थांचा भाग असल्यामुळे विविध कोरियन ड्रामा सीरिज केल्या. Momo नावाच्या एका संगीतमय ड्रामामधे त्याच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले गेले.
५: अनुपमनी हे अब्दुल अलीचे पात्र करण्याआधी त्याचा पूर्ण अभ्यास केला होता असे सांगितले. त्याने असे सांगितले की अब्दुलचे हे पात्र मी माझ्या पूर्ण क्षमतेने निभावण्याचा प्रयत्न करीन, तसेच भविष्यातही अशा प्रकारचे रोल करायला मला आवडेल.
अनुपम याने मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यानी साकारलेली पात्र इतके लोकप्रिय झाले आहे की आता प्रेक्षक या पात्रासाठी न्याय मागत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App