वृत्तसंस्था
काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान पुष्कमल दहल प्रचंड यांच्या विरोधात सामूहिक हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माओवादी पीडित पक्षाच्या वतीने काही वकिलांनी पंतप्रधानांविरोधात खटला दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी गुरुवारी (9 मार्च) सुनावणी निश्चित केली आहे.Nepal Prime Minister Prachanda will appear in the Supreme Court, accepts responsibility for the death of 5 thousand people
वास्तविक, तीन वर्षांपूर्वी 15 जानेवारी 2020 रोजी काठमांडूमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये कमल दहल प्रचंड यांनी माओवाद्यांनी सुरू केलेल्या सशस्त्र बंडखोरीदरम्यान मारल्या गेलेल्या 17,000 नागरिकांपैकी 5,000 नागरिकांच्या हत्येची जबाबदारी घेण्याचे म्हटले होते. केवळ 5000 हत्यांची जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, 17 हजार लोकांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.
17 हजार हत्या
प्रचंड म्हणाले की,5000 हत्यांची जबाबदारी घेतो, मात्र 17 हजार मृत्यूंना जबाबदार असल्याचे म्हटले होते, जे योग्य नाही. ते म्हणाले की, 5000 खुनांच्या चर्चेतून मी मागे हटणार नाही, त्यापासून पळ काढणार नाही, मात्र सर्वच हत्यांसाठी दोष देणे योग्य नाही. दशकभर चाललेल्या बंडखोरीमुळे प्रचंड या प्रकरणात नव्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
13 फेब्रुवारी 1996 रोजी बंडखोरी सुरू झाली आणि 21 नोव्हेंबर 2006 रोजी सरकारशी सर्वसमावेशक शांतता करारानंतर अधिकृतपणे समाप्त झाली. या बंडात हजारो लोक मारले गेले. त्यावेळी माओवाद्यांना नेपाळची सत्ता काबीज करायची होती आणि त्यांची सूत्रे प्रचंड यांच्या हातात होती. प्रचंड यांच्या सांगण्यावरूनच हल्ले झाले आणि हजारो लोक मरण पावले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App