वृत्तसंस्था
काठमांडू : Nepal नेपाळमध्ये तीन माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पक्षांकडून युतीची तयारी सुरू आहे. ही युती संसदेच्या वरच्या सभागृहातील ‘राष्ट्रीय सभा’ निवडणुकीसाठी असू शकते. या युतीमध्ये मधेस क्षेत्रातील पक्षालाही समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे.Nepal
नेपाळी वृत्तपत्र द काठमांडू पोस्टनुसार, नेपाळी काँग्रेस, CPN-UML, नेपाळी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता समाजवादी पक्ष यांच्यात जागावाटप आणि संयुक्त रणनीतीवर चर्चा सुरू आहे. ही निवडणूक २५ जानेवारी रोजी होणार आहे.Nepal
राष्ट्रीय सभेत एकूण ५९ सदस्य असतात. यापैकी दर दोन वर्षांनी एक-तृतीयांश सदस्य निवृत्त होतात. यावेळी ४ मार्च रोजी १८ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक घेतली जाईल.Nepal
सुरुवातीच्या चर्चेतून असे समोर आले आहे की, काँग्रेसला ७ जागा, UML ला ६ जागा, नेपाळी कम्युनिस्ट पक्षाला ४ जागा आणि जनता समाजवादी पक्ष नेपाळला १ जागा मिळू शकते.
उमेदवारांना 7 जानेवारीपर्यंत नामांकन दाखल करायचे आहे.
काँग्रेस नेत्यांनुसार, पार्टी मंगळवारपर्यंत आपल्या उमेदवारांची नावे निश्चित करू शकते. सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पूर्ण बहादूर खड्का, रमेश लेखक आणि कृष्ण प्रसाद सिटौला यांनी UML अध्यक्ष केपी शर्मा ओली आणि महासचिव शंकर पोखरेल यांची भेट घेतली.
या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली. तर UML ने देखील आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी मंगळवारी पक्षाच्या सचिवालयाची बैठक बोलावली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, सर्व उमेदवारांना बुधवारी म्हणजेच 7 जानेवारी रोजी नामांकन दाखल करावे लागेल.
सार्वत्रिक निवडणुकीसाठीही चर्चा सुरू
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यसमितीच्या बैठकीत उपाध्यक्ष पूर्णबहादूर खड्का यांनी सांगितले की, संविधान निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या राजकीय शक्ती राष्ट्रीय सभेच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यास सहमत आहेत.
काँग्रेस अध्यक्ष शेरबहादूर देउबा यांच्या वतीने खड्का यांनी यापूर्वीही केपी शर्मा ओली यांच्याशी युतीबाबत चर्चा केली होती. काँग्रेस आणि यूएमएल यांच्यात आगामी संसदीय निवडणुकांसाठीही युतीची चर्चा सुरू असली तरी, यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
नेपाळमध्ये 5 मार्च 2026 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या दिवशी देशाचे नागरिक संसदेच्या कनिष्ठ सभागृह, प्रतिनिधी सभेसाठी मतदान करतील, ज्यात एकूण 275 सदस्य निवडले जातात.
सर्वाधिक सदस्य केपी ओली यांच्या पक्षातून निवृत्त होतील.
संसदीय सचिवालयाच्या नोंदीनुसार, मार्चमध्ये सर्वाधिक सदस्य यूएमएल पक्षातून म्हणजेच केपी शर्मा ओली यांच्या पक्षातून निवृत्त होतील. यूएमएलच्या 8 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होईल. त्यानंतर नेपाळी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित माजी माओवादी सेंटरचे 7 सदस्य पुढील चार वर्षांत निवृत्त होतील. राष्ट्रीय सभेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.
मार्चमध्ये सीपीएन (युनिफाइड सोशलिस्ट), जनता समाजवादी पक्ष-नेपाळ आणि लोकतांत्रिक समाजवादी पक्षाचा प्रत्येकी एक सदस्यही निवृत्त होईल. तर नेपाळी काँग्रेसच्या कोणत्याही सदस्याचा कार्यकाळ यावेळी संपत नाहीये, जरी तो वरिष्ठ सभागृहातील दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे.
राष्ट्रीय सभेच्या १९ जागांपैकी १८ जागांसाठी निवडणूक होईल, तर एका सदस्याला सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जाईल. संविधानानुसार, राष्ट्रीय सभा संसदेचे स्थायी सभागृह आहे. कनिष्ठ सभागृह म्हणजेच प्रतिनिधी सभा १२ सप्टेंबर रोजी विसर्जित करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App