‘NDA’ १८ जुलै रोजी दिल्लीत करणार शक्तीप्रदर्शन! आतापर्यंत १९ पक्षांना पाठवलं निमंत्रण

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, त्याचा रौप्यमहोत्सव साजरा होत आहे. यासंदर्भात 18 जुलै रोजी नवी दिल्लीत आघाडीतील घटक पक्षांची मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीसाठी आतापर्यंत 19 राजकीय पक्षांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या बैठकीकडे 2024 च्या निवडणुकीपूर्वी NDA चे शक्तीप्रदर्शन म्हणूनही पाहिले जात आहे.  NDA will show power in Delhi on July 18 Invitation sent to 19 parties so far

NDA ची स्थापना 25 वर्षांपूर्वी मे 1998 मध्ये झाली होती. भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांना त्याचे पहिले अध्यक्ष बनवण्यात आले. सध्या भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचे अध्यक्ष आहेत. स्थापनेपासून, ममता बॅनर्जींचा पक्ष TMC, DMK, नॅशनल कॉन्फरन्स, JDU यासह सुमारे 41 राष्ट्रीय किंवा राज्य पक्ष NDA चे सदस्य राहिले आहेत.

बैठकीत या पक्षांना निमंत्रण पाठवण्यात आले –

चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)

शिवसेना (शिंदे गट)

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

उपेंद्र कुशवाह यांचा लोक समता पक्ष

जीतन राम मांझी यांचा हिंदुस्थान अवाम मोर्चा

संजय निषाद यांची निर्बल इंडियन शोषित हमारा अपना दल (निषाद) – निषाद पक्ष

अनुप्रिया पटेल यांचा अपना दल (सोनेलाल)

जननायक जनता पार्टी (JJP)- हरियाणा

जनसेना- पवन कल्याण, आंध्र प्रदेश

AIMDMK – तामिळनाडू

तमिळ मनिला काँग्रेस

भारत मक्कल कालवी मुनेत्र कळघम

झारखंडचे AJSU

राष्ट्रवादी- कॉनरॅड संगमा

नागालँडचा NDPP

सिक्कीमचे एस.के.एफ

मिझो नॅशनल फ्रंट ऑफ झोरमथंगा

आसाम गण परिषद

सुहेलदेव भारतीय समाज पक्ष – ओमप्रकाश राजभर

NDA will show power in Delhi on July 18 Invitation sent to 19 parties so far

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात