आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंडमध्ये ( Jharkhand ) लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. अलीकडेच निवडणूक आयोगाच्या टीमने रांचीमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आता निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, झारखंड निवडणुकीत एनडीएही पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीबाबत भाजपने आपल्या मित्रपक्षांची घोषणा केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की भाजप झारखंड विधानसभा निवडणूक त्यांच्या मित्रपक्ष AJSU आणि JDU सोबत लढवेल.
Congress : हरियाणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात बड्या – बड्या गोष्टी; पण संघटनेत बेरजेपेक्षा वजाबाकीच मोठी!!
आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड निवडणूक सह-प्रभारी हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी एनडीए आघाडीत सामील होणाऱ्या पक्षांची नावे जाहीर केली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष झारखंडमधील आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) घटक ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) आणि जनता दल (युनायटेड) सोबत लढवेल. भाजपचे झारखंड निवडणुकीचे सह-प्रभारी शर्मा म्हणाले की, मित्रपक्षांमधील जागावाटपाचा करार अंतिम टप्प्यात आहे.
रांचीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, “भाजप झारखंडची निवडणूक AJSU आणि JDU सोबत लढवेल. मित्रपक्षांसोबत ९९ टक्के जागांवर एकमत झाले आहे. उर्वरित एक-दोन जागांसाठी बोलणी सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल.”
हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, 2 ऑक्टोबर रोजी संपत असलेल्या ‘पितृ पक्षा’नंतर यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल. झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस 81 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणुका प्रस्तावित आहेत. निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर केल्या जाऊ शकतात
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App