Nawab Malik : नवाब मलिकांवर नव्हे, सना नवाब मलिकांवर अजितदादांनी दिली राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी!!

Nawab Malik

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्यावर नव्हे, तर त्यांची कन्या सना नवाब मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली.

अजित पवारांची जनसंवाद यात्रा आज आमदार नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या मतदारसंघात पोहोचली. यावेळी नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या यात्रेचे स्वागत केले. अजित पवार आणि नवाब मलिक आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात उघडपणे एकाच मंचावर बसले.

विशेष म्हणजे नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोध आहे. मात्र अजित पवार आणि नवाब मलिक यांनी आज एकाच गाडीने प्रवास केला तसेच एकाच मंचावर हे दोन्ही नेते एकत्र आले. असे असले तरी अजितदादांनी नवाब मलिक यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नेमले नाही, तर त्यांनी आज नवाब मलिक यांच्या कन्या सना नवाब मलिक यांना पक्षाची प्रवक्ता नेमले.



अजित पवार म्हणाले :

महिलांना आणि तरुणांना संधी द्यायची आहे म्हणून आम्ही सना नवाब मलिक यांना प्रवक्ता म्हणून घोषित करत आहोत. सना मलिक यांचे इंग्लिश, हिंदी चांगले आहे, तसेच मराठी पण चांगले होईल. सना मलिक यांना कसलीही गरज लागली तर अगदी रात्री 12.00 वाजता सुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

विरोधक अल्पसंख्यांकांबाबत अनेक खोट्या गोष्टी बोलले. कुठेतरी सीएए, एनआरसीबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या गेल्या. पण ते फक्त त्या भारतीयांसाठी होते, जे परदेशात समस्यांना तोंड देत आहेत. ज्या भूमीवर आम्ही पार्टी बनवली त्याच जमिनीवर आम्ही अल्पसंख्याकांसाठी पार्टी केली. वक्फ बोर्डाच्या बाबतीत अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि हे फक्त अल्पसंख्याकांचे नाही, कोणत्याही समाजावर अन्याय होत असला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू. आम्ही कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही.

NCP’s spokesperson to Sana Nawab Malik, not Nawab Malik!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात