ज्याचे मंत्री, त्याचे निर्णय भाजप महायुतीची पॉलिसी; पण बदनामी होत चाललीय फडणवीस सरकारची!!

नाशिक : ज्याचे मंत्री, त्याचे निर्णय ही भाजप महायुतीने पॉलिसी स्वीकारली, पण बदनामी मात्र फडणवीस सरकारची होत चालली. असे सध्या दिसून येत आहे. BJP fadnavis government

महायुतीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन घटक पक्षांचे मंत्री फडणवीस सरकार मध्ये काम करतात. मात्र, महायुतीने हे सरकार बनवताना मंत्र्यांची यादी संबंधित पक्षप्रमुखांनी द्यावी. त्यांची जबाबदारी पक्षप्रमुखांनीच घ्यावी, असे धोरण ठरवले आणि या सरकारचे मुख्यमंत्री जरी भाजपचे देवेंद्र फडणवीस असले तरी धोरण म्हणून मंत्रिमंडळातले शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे ऐकतील. राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवारांचे ऐकतील आणि भाजपचे मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐकतील, असे ठरविले. सत्तेचे वाटप मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एकत्र बसून ठरवतील हे धोरण स्वीकारले. वरवर पाहता हे धोरण अतिशय समन्वयाचे आणि सौहार्दाचे दिसले. परंतु प्रत्यक्ष राजकीय व्यवहारात मात्र हे धोरण फसले. किंबहुना त्या धोरणाचा फटका महायुतीतल्या भाजप या सगळ्यात मोठ्या पक्षाला बसताना दिसला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण “ग्रीप” मंत्रिमंडळावर दिसायला हवी होती, तशी ती 2014 ते 2019 या कालावधीत दिसली देखील होती. पण 2024 नंतरच्या गणितात फडणवीसांची मंत्रिमंडळावरची “ग्रीप” तितकी बळकट राहिल्याचे आज तरी चित्र दिसत नाही. याला कारणीभूत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अजित पवारांची राष्ट्रवादी अधिक ठरली आहे.



राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर आले. “पवार संस्कारित” नेते मुळातच भ्रष्टाचारी असतात. ते राजकीय दृष्ट्या अनेकदा उर्मट व्यवहार करतात हे माहिती असूनही फडणवीसांनी आणि भाजप पक्षश्रेष्ठींनी अजितदादांना मंत्रिमंडळात स्थान दिले. त्याचा फटका फडणवीस सरकारला बसताना दिसतो आहे. धनंजय मुंडे हे संतोष देशमुख प्रकरणात कृषिमंत्री म्हणून त्यांनी केलेले भ्रष्टाचार बाहेर आले. माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना “भिकारी” म्हणाले. माणिकरावांना 420 कलमा खालच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

पवार संस्कारित दोन नेत्यांचे हे उद्योग जर भाजपच्या नेत्यांनी केले असते तर त्यांना भाजप श्रेष्ठी केव्हाच राजकीय शिक्षा करून ते मोकळे झाले असते. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे जर भाजपचे मंत्री असते, तर त्यांना फडणवीसांनी मंत्रिमंडळातून केव्हाच बाहेरचा रस्ता दाखविला असता. पण केवळ अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री म्हणून त्यांना “सांभाळण्याची” वेळ फडणवीसांवर आली आहे. माणिकराव कोकाटे यांना फसवणुकीच्या 420 कलमाखाली दोन वर्षांची शिक्षा होऊन देखील त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी वाचवायची वेळ भाजपने नेमलेल्या विधानसभेच्या अध्यक्षांवर आली. यातून भाजपची राज्यभर बदनामी होत आहे.

ज्याचे मंत्री, त्याचे निर्णय हे भाजप महायुतीने ठरविलेले धोरणच याला कारणीभूत ठरले आहे. त्याऐवजी कोणत्याही स्थितीत कोणावरही आरोप झाले आणि त्यामध्ये तथ्य आढळले, तर मंत्रिमंडळाच्या बाहेर जावे लागेल, हा वचक भाजप श्रेष्ठींनी ठेवला असता, तर भाजपची बदनामी होण्याची वेळ महाराष्ट्रात येऊ शकली नसती.

अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपच्या महायुतीला बिलकुल गरज नाही. उलट भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा गैरफायदा राष्ट्रवादीचे नेते घेत चालल्याची उदाहरणे समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्या कन्येचे रायगडचे पालकमंत्री पद वाचवण्यासाठी आक्रमक होऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर तुटून पडले आहेत. राजकीय सभ्यतेचा बुरखा त्यांनी पांघरला आहे, पण रायगड मध्ये शिवसेनेचे आमदार जास्त असल्याची वस्तुस्थिती त्यांना पचलेली दिसत नाही. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रीपदावरून दमदाटी केली आहे.

उद्या हीच दमदाटी ते भाजपच्या नेत्यांना करू लागल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण राष्ट्रवादीची मूलभूत प्रवृत्तीच भ्रष्टाचाराची आणि स्वाभिमानाच्या नावाखाली दमबाजीचे राजकारण करण्याची राहिली आहे. भाजपच्या नेत्यांनी वेळीच त्यांचे उपद्रव मूल्य ओळखून त्यांना टांचेखाली ठेवण्याची गरज आहे, तरच राष्ट्रवादी प्रवृत्तीचे नेते “सरळ” राहतील. नाहीतर भाजपच्या नेत्यांच्या डोक्यावरून हात फिरवायला देखील ते कमी करणार नाहीत हे काँग्रेसच्या उदाहरणावरून भाजपच्या नेत्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

NCP ministers corruption, political trouble for BJP fadnavis government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात