NCERT ने हटवलेला अभ्यासक्रम केरळात शिकवणार, गुजरात दंगलीचे प्रकरण पुन्हा समाविष्ट करणार


प्रतिनिधी

तिरुवनंतपुरम : NCERT कडून वगळण्यात आलेला अभ्यासक्रम केरळमधील शाळांमध्ये शिकवण्याची शिफारस केली जात आहे. मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी आधीच याचे समर्थन केलेले आहे. पुस्तकांतून हटवण्यात आलेली मुघल इतिहास आणि गुजरात दंगलींची प्रकरणे पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.NCERT to teach deleted syllabus in Kerala, re-introduce case of Gujarat riots

NCERT ने शालेय पाठ्यपुस्तकांतून मुघल इतिहास, गुजरात दंगल आणि डार्विनचा सिद्धांत हटवला होता. या संदर्भात केरळातील अभ्यासक्रम ठरवणाऱ्या समितीने मंगळवारी एक बैठक घेतली. यात NCERT ने हटवलेला भाग अभ्यासक्रमात पुन्हा समाविष्ट करण्याची सूचना देण्यात आली.



बैठकीत पुरवणी पाठ्यपुस्तक तयार करण्याची सूचना

राज्याचे शिक्षणमंत्री व्ही. सिवानकुट्टी म्हणाले की, अभ्यासक्रम ठरवणाऱ्या समितीने निर्णय घेतला आहे की, NCERT हटवलेला भागही मुलांना शिकवायला हवा. याविषयी केरळचे मुख्यमंत्री आणि केंद्राला माहिती दिली जाईल. यासोबतच NCERT ने गरजेचा भाग हटवल्याबद्दल पंतप्रधान आणि केंद्रिय शिक्षण मंत्र्यांकडे तक्रारही केली जाईल.

यावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी समितीने शिक्षणमंत्री सिवानकुट्टी यांची निवड केली आहे. या बैठकीत पुरवणी पाठ्यपुस्तक तयार करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. या प्रकरणी अंतिम निर्णय राज्य सरकार आणि मुख्यमंत्री पिनारई विजयन घेतील.

NCERT कडून अभ्यासक्रमातील काही भाग वगळण्याच्या निर्णयाला केरळ सरकारने सुरूवातीपासूनच विरोध केला आहे. राजकीय हेतूने पाठ्यपुस्तकांतून काही प्रकरणे आणि घटना हटवण्याचा निर्णय हा केवळ इतिहासाशी छेडछाड नसून आक्षेपार्हही आहे असे मुख्यमंत्री पिनारई विजयन यांनी म्हटले आहे.

NCERT to teach deleted syllabus in Kerala, re-introduce case of Gujarat riots

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात