विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आर्यन खान आता जरी जामिनावर बाहेर असला तरी तो पुन्हा अडचणीत येऊ शकतो. एनसीबी आर्यन खानच्या जामीनाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा विचार करत आहे व उच्च न्यायालयाच्या आदेशावर कायदेशीर मत घेत आहे असे एनसीबी तर्फे सांगितले आहे.
NCB to take action again on Aryan Khan drugs case
२ ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझ हे गोव्याला जाणार होते. त्या जहाजावर एनसीबीने छापा टाकला होता व ड्रग्स जप्त केले होते. या जहाजावर आर्यन खान होता. त्याची दीर्घ चौकशी करून त्याला ३ ऑक्टोबरला अटक केले होते. २८ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला होता. न्या. सांबरे यांनी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांची १लाख रुपयांच्या जामिनावर सुटका केली होती. १४ पानी आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आर्यन व इतर आरोपींबाबत असा सकारात्मक पुरावा आढळलेला नाही, की त्यानी कट रचला होता. आर्यनच्या मोबाईलवरील व्हाटस्अॅपमधील संदेशावरून आरोपींनी गुन्हा करण्याचा कट केला होता असे दर्शवणारे काही आक्षेप घेण्यासारखे आढळून आले नाही.
Mumbai Cruise Drug Case : नुपूर सतिजाकडून बेकायदेशीररीत्या ड्रग्ज जप्त केले होते, शोध घेणारी महिला NCB अधिकारी नव्हती
एनसीबीने नोंदवलेले आर्यन खानचे जबाब एनडीपीएस कायदा कलम ६७ खाली तपासाच्या उद्देशाने विचारात घेतले जाऊ शकतात. आरोपीने एनडीपीएस कायदा अंतर्गत गुन्हा केला आहे असा निष्कर्ष काढणेसाठी तो वापरला जाऊ शकत नाही असे जामीन आदेशात म्हटले आहे.
आर्यन व इतर दोन आरोपींविरुद्ध एसीबीने सादर केलेल्या पुराव्यावरून या तिघांनी षड्यंत्र केल्याचा सकारात्मक पुरावा सकृतदर्शनी दिसत नाही. आर्यनकडे अमली पदार्थ सापडले नाही. अरबाज व धमेचाकडे अमली पदार्थ साठा आढळला पण तो अल्प प्रमाणात होता. त्यामुळे या तीन आरोपी विरोधात षडयंत्र रचणेबाबत पुरावा पुरेसा आहे का? व त्यांच्यावर एनसीबी कट केला असल्याचा आरोप लावू शकते का याची तपासणी होणे गरजेचे आहे. कोर्टाने या आदेशात म्हटले आहे की, त्यासाठी बेकायदेशीर कृत्य केल्याचा पुरावा आहे का हे पहावे लागते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App