पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी नवज्योत सिद्धूंची तडफड पुन्हा एकदा समोर आली आहे. सिद्धू यांनी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दही काढले. पंजाब काँग्रेसने गुरुवारी झिरकपूर येथून मोर्चाला सुरुवात केली. यादरम्यान सिद्धू म्हणाले की, जर सरदार भगवंत सिंह (नवज्योत सिद्धूंचे वडील) यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर यश काय असते ते तुम्हाला दिसेल. सिद्धू चन्नींबद्दल म्हणाले की, ते 2022 मध्ये काँग्रेसला बुडवतील. Navjot Sidhu Punjab CM Viral Video Navjot Singh Sidhu On Charanjit Singh Channi During Lakhimpur Kheri Violence Protest March
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी नवज्योत सिद्धूंची तडफड पुन्हा एकदा समोर आली आहे. सिद्धू यांनी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्दही काढले. पंजाब काँग्रेसने गुरुवारी झिरकपूर येथून मोर्चाला सुरुवात केली. यादरम्यान सिद्धू म्हणाले की, जर सरदार भगवंत सिंह (नवज्योत सिद्धूंचे वडील) यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर यश काय असते ते तुम्हाला दिसेल. सिद्धू चन्नींबद्दल म्हणाले की, ते 2022 मध्ये काँग्रेसला बुडवतील.
सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली पंजाब काँग्रेसचा लखीमपूर खेरीमध्ये आक्रोश मोर्चा गुरुवारी मोहाली विमानतळ चौकातून काढण्यात आला. सिद्धू वेळेवर पोहोचले, परंतु ताफा आणि जाममुळे मुख्यमंत्री चन्नी यांना काही काळ विलंब झाला. यावर सिद्धू संतापले आणि त्यांनी चन्नीबद्दल राग व्यक्त केला.
सिद्धू यांना मोर्चा पुढे नेण्याची इच्छा असल्याचे कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये उघड झाले. मग मंत्री परगट सिंह म्हणतात की, मुख्यमंत्री चन्नी 2 मिनिटांत पोहोचणार आहेत. यावर सिद्धू संतापले आणि म्हणाले की, आम्ही इतका वेळ त्यांची वाटच पाहत होतो. यानंतर सिद्धू थोडे पुढे गेले, पण तोपर्यंत सीएम चन्नी पोहोचले होते. मात्र, घरात मुलाचा विवाह सोहळा असल्याने ते थोड्या वेळाने परत गेले.
येथे, परगट सिंह पुन्हा एकदा गर्दी दाखवताना म्हणाले की, आज तर बल्ले-बल्ले झाली. सिद्धूजवळ उभ्या असलेल्या कार्य प्रमुख सुखविंदर डॅनीदेखील म्हणाले – हा कार्यक्रम यशस्वी आहे. या दोघांमधील संभाषणानंतर सिद्धू जोशात म्हणाले की- आता यश थोडीच आहे, जर मला मुख्यमंत्री केले तर यश दिसले असते. यानंतर सिद्धू यांनी सीएम चन्नी यांच्याबद्दल अपशब्द काढत म्हटले की, ते 2022 मध्ये ते काँग्रेसलाच बुडवतील.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिरोमणी अकाली दलाने (बादल) सिद्धू यांना टोला लगावला आहे. अकाली दलाचे प्रवक्ते दलजीत चीमा म्हणाले की, सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाबद्दल किती आदर आहे, हे यावरून सिद्ध होते. ते त्यांच्यासाठी 2 मिनिटेही थांबू शकले नाहीत. एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्यात आल्याची सिद्धू यांची दु:ख आहे. चीमा म्हणाले की, सिद्धू यांचा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नसून एकमेकांपेक्षा पुढे जाण्यासाठी होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App