वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सागरी क्षेत्रात चीनकडून मिळत असलेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत हिंद महासागरात आतापर्यंतचा सर्वात मोठा वॉर गेम आयोजित करत आहे. यामध्ये अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, दक्षिण कोरियासह 50 देशांच्या नौदलांचा समावेश असेल. २० देश युद्धनौकांसह सहभागी होत आहेत.navies of 50 countries including India in the Arabian Sea; Challenge to China, 20 countries participate in war games with warships
नौदलाच्या सहभागाच्या दृष्टीने हा आतापर्यंतचा जगातील सर्वात मोठा युद्धसराव असेल. भारतीय नौदल आयएनएस विक्रमादित्य व आयएनएस विक्रांतसह किमान 30 युद्धनौका तैनात करेल. चीन आता सागरी मार्गाने श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीवमध्ये आपली पकड मजबूत करण्यात व्यग्र आहे. त्याने अलीकडेच एक सर्वेक्षण जहाज मालदीवला पाठवले होते.
ड्रोन हल्ल्यांपासून बचावाचा सराव करणार
नौदलअरबी समुद्रातील व्यापारी मार्गांवर अलीकडच्या काळात झालेल्या ड्रोनहल्ल्यांमुळे जगाची चिंता वाढली आहे. सूत्रांनी सांगितले की, मिलन सरावामध्ये नौदल ड्रोन हल्ल्यांपासून बचावाचा सराव करणार आहे आणि चाचेगिरीच्या विरोधात नौदल ऑपरेशन्सची रचनादेखील करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App